त-हाडी ग्रामपंचायतीचे वार्ड निहाय आरक्षण जाहीर
त-हाडी – शिरपुर तालुक्यातील त-हाडी येथे ग्रामपंचायत कार्यालयात महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांच्या आदेशान्वये २०२३ व २०२४ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीचा प्रभाग रचना व आरक्षणाबाबत कार्यक्रम जाहीर झाल्याने त-हाडी ग्रामपंचायत कार्यालयात प्रारुप प्रभाग रचनेवर आरक्षणाची सोडत काढण्यात आली ही सोडत जवखेडा मंडळ अधिकारी अधिकारी पी ,पी,ढोले , तऱ्हाडी तलाठी संतोष अहिरे . तलाठी भाऊसाहेब चव्हाण यांच्या उपस्थितीत ग्राम सभा घेण्यात आली त-हाडी लोकनियुक्त संरपच आरक्षण सर्व साधारण जनरल असून वार्ड-क्रमांक१ (जागा-३)
१)सर्व साधारण अनुसूचित जमाती (ST)
२)सर्व साधारण अनुसूचित जाती ( S C,) ,
३)सर्व साधारण महिला
वार्ड क्रमांक २(जागा-२)
१)सर्व साधारण
अनुसूचित जमाती महिला (S T)
२)सर्व साधारण महिला
वार्ड क्रमांक ३(जागा २)
१)सर्व साधारण
२)अनुसूचित जमाती महिला (S,T)
वार्ड क्रमांक ४(जागा २)
१)सर्व साधारण
२)अनुसूचित जमाती महिला (ST)
वार्ड क्रमांक -५(जागा ३)
१)सर्व साधारण महिला जनरल
२)सर्व साधारण अनुसूचित जमाती महिला (ST)
३)सर्व साधारण महिला जनरल
असे आरक्षण आहे तसेच त-हाडी येथे द्वितीय लोकनियुक्त सरपंचासाठी मतदान असल्यामुळे प्रत्येक हालचालीवर राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते व ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे नवीन वार्ड रचनेसाठी गावातील आजी व माजी सरपंच व तसेच युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती होते या सभेसाठी माजी सरपंच सुदाम भलकार माजी उपसरपंच ओंकार पाटील व अशोक सोनवणे,सुनील पाकळे ,विलास भामरे पोलिस पाटील प्रतापसिंह गिरासे संजय जाधव .गौतम अहिरे, विशाल करंके, ज्ञानेश्वर भामरे भुषण बागुल
फोटो – शिरपूर तालुक्यातील त-हाडी येथे ग्रामपंचायत वार्ड रचना निहाय आरक्षण सोडत जाहीर करताना निवडणूक अधिकारी पी पी ढोले, भाऊसाहेब, चव्हाण, संतोष अहिरे ग्रामस्थ







