माता रमाई आंबेडकर या प्रचंड त्यागाचे प्रतिक होत्या .…..रिटा माने – देशमुख
खरसुंडी प्रतिनिधी
माता रमाई आंबेडकर या प्रचंड त्यागाचे प्रतिक होत्या . असे उदगार खरसुंडीच्या सामाजीक कार्यकर्त्या रिटा माने – देशमुख यांनी काढले .
अग्रणी सोशल फौंडेशन यांच्या अंतर्गत खरसुंडी येथे माता रमाई याची जयंती साजरी करण्यात आली . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सारीका आदिनाथ भिसे या होत्या .
आंबेडकर नगर मधील संविधान गटाच्या महिलांनी एकत्रित येऊन माता रमाई जयंती साजरी केली.
प्रमुख पाहुण्या श्रीमती शारदा संदीपान भिसे यांच्या उपस्थितीत प्रथम सर्व महिलांनी माता रमाईंच्या प्रतिमेस अभिवादन केले.
सामाजीक कार्यकर्त्या रिटाताई माने – देशमुख यांनी, माता रमाईचा जीवनपट सांगताना उलघडून रमाईंचे जन्म स्थान, विवाह, संसार, समाजाप्रती रमाईंची मदत, स्वाभीमान यावर भाष्य केले .
रिटा माने देशमुख म्हणाल्या, माता रमाई आंबेडकर या प्रचंड त्यागाचे प्रतिक होत्या . समाधान, सहकार्य आणि सहिष्णूतेचे शिखर असणाऱ्या रमाई आंबेडकर यांनी, देशाचा, जगाचा, मानवजातीचा उध्दार करणाऱ्या डॉ . बाबासाहेब आंबेडकर या आपल्या पतीच्या प्रचंड कार्यात कोणत्याही प्रकारचा अडथळा येवू नये, याची सतत काळजी घेतली. ओढगस्त, वंचित स्थितीने डोळ्यादेखत ४ मुले दगावली असतानाही या माऊलीने कमालीचे धैर्य दाखवून डॉ . बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रापंचिक जीवनाची ढाल बनण्याचे काम त्यांनी केले .
श्रीमती कमल भिसे व वंदना होवाळ यांनी भिमराव व रमाई यांच्या जीवनावर गीत गायन केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात, शारदा भिसे (आई) यांनी , माता रमाई यांच्या कार्याबद्दल माहिती सांगितली. सौ अर्चना भंडारे यांनी यावेळी जिलेबीचे वाटप केले . यावेळी संगिता भिसे, निकीता भिसे, रुपा भिसे, माया भंडारे, सुभद्रा भिसे, लक्ष्मी तुपे, अनघा भिसे, सोनाली ताई उपस्थित होत्या. सुत्र संचालन सामाजिक कार्यकर्त्या रिटा माने देशमुख यांनी केले .







