साडेतीन किलोमीटर रस्त्यावरील मुरूम गायब
रस्त्यावरील धुळीने नागरिकांचे व गुरा.. ढोरांचे आरोग्य धोक्यात
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी तालुक्यातील पश्चिम भागातील शेवटचे टोक असणारे विभूतवाडी गाव..सातारा व सांगली जिल्ह्याच्या तर खटाव माण आटपाडी तालुक्याच्या सर हद्दीवर गावच्या तिन्ही बाजूंनी डोंगर असून. सर्वच शासकीय योजनेपासून वंचित असणारे गाव आहे.
या गावामध्ये पूर्व खर्जे वस्ती ते पश्चिम खर्जे वस्ती असा साडे तीन किलोमीटरचा मुरमीकरण रस्ता रोजगार हमीतून झाला आहे .परंतु या रस्त्यावर कोणत्याही पद्धतीचा मुरूम टाकलेला नाही. संपूर्ण साडेतीन किलोमीटरवर या रस्त्यावर माती भरलेली आहे.
सध्या या रस्त्यावरून येणा- जाणाऱ्या वाहनामुळे रस्त्या शेजारी राहणाऱ्या नागरिकांना व जनावरांना या धुळीचा अतिशय नाहक त्रास होत आहे. एखादे चार चाकी वाहन गेले तर या रस्त्यावरून धूळ मोठ्या प्रमाणात उडताना दिसत आहे. प्रत्यक्षात पाहता हा रस्ता मुरमीकरण रस्ता म्हणून करण्यात आलेला आहे परंतु या साडेतीन किलोमीटर रस्त्यावर कुठेही मुरूम टाकलेला नाही.
या रस्त्याची बिले मात्र मुरमीकरणाची काढलेली आहेत. परंतु रस्त्यावर मुरमीकरण न टाकल्याने सध्या या रस्त्यावरून येणार जाणाऱ्या वाहनामुळे धुळीचा त्रास रस्त्यालगत राहणाऱ्या नागरिकांना होत आहे.
याबाबत आटपाडी पंचायत समितीतील संबंधित कार्यालयाशी संपर्क साधला असता तेथील अधिकारी म्हणाले की हा रस्ता मुरमीकरण आहे व या रस्त्यासाठी 19,504,80 एवढी रक्कम खर्च झाली आहे असे मारेगाचे गायकवाड यांनी सांगितले.
परंतु सध्य परिस्थितीमध्ये या रस्त्यावर कुठेही मुरूम दिसून येत नाही .सर्व माती या रस्त्यावर भरलेली आहे. याबाबत रस्ता सुरू असताना अनेक वेळा तक्रारी झाल्या होत्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष येऊन पाहणी केली होती परंतु या गोष्टीकडे कानाडोळा केला गेला होता .
रस्ता करण्यासाठी इस्टिमेट मुरमीकरणाचे आहे पैसे मुरमीकरणाचे निघाले आहेत .परंतु प्रत्यक्षात रस्त्यावर कुठेही मुरूम टाकलेला नाही व कुठेही मरून टाकलेला दिसून येत नाही. सध्या या रस्त्यावर सर्व मातीच दिसून येत आहे .आणि या मातीच्या रस्त्यामुळे रस्त्यावरून ये जा करणाऱ्या वाहनामुळे रस्त्या ंच्या कडेला रहात असणाऱ्या नागरिकांना व गुराढोरांना या धुळीचा त्रास मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे.
तरी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रस्त्यासाठी मंजूर झालेली रक्कम व प्रत्यक्षात खर्च झालेली रक्कम व सध्या रस्त्याची परिस्थिती याची पाहणी करून योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
फोटो.. मुरमिकरन रस्त्यावरील मुरूम गायब







