आमदार संदीप भैया क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त खडकी घाट येथे नागरिकांना मोफत कोविड-19 लस
बीड-तालुक्यातील खडकीघाट येथील नागरिकांना बीड जिल्ह्याचे लाडके आमदार संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांना करोना लस मोफत देण्याचे नियोजन माजी सरपंच बाबासाहेब तावरे यांनी केले होते
.ही लस देण्याचे नियोजन बंकटस्वामी विद्यालय खडकी घाट या शाळेत सकाळी ठीक १० ते ५ या वेळेत करण्यात आले होते. आरोग्य कर्मचारी तसेच माजी सरपंच बाबासाहेब तावरे यांचा छोटेखाणी बंकटस्वामी विद्यालया तर्फे सत्कार पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला व लस देण्यास प्रारंभ करण्यात आला .
ही लस घेण्यासाठी खडकी येथील व परिसरातील नागरिकांनी लस घेण्याचा लाभ घेतला.ही लस देण्यासाठी आरोग्य खात्यातील कर्मचारी उपस्थित होते यात मा. सय्यद एस .आय.( आरोग्य सहाय्यक), शेख नसीर (सी. एच. ओ.) जावेद सय्यद (आरोग्य कर्मचारी )श्याम सुंदर मांडवे (आरोग्य कर्मचारी) थोरात संगीता (आरोग्य कर्मचारी) कृतिका पाट कुलरकर (आरोग्य प्रशिक्षणार्थी) वर्षा संजय भोसले (आशा स्वयंसेविका) तसेच सहाय्यक बोराडे काकू तसेच वत्सलाबाई आनेराव, ज्ञानेश्वर गणगे (ग्रामपंचायत सदस्य )तसेच बंकट्स्वामी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. संजय सावंत सर व सर्व शिक्षक बंधू व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच गावातील नागरिक खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
कार्यक्रमाचे सत्कार प्रसंगी सूत्र संचालन श्री सुरेश भोसले बापू यांनी केले तर सर्वांचे आभार राम हरी रिंगे सर यांनी मानले कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांची जेवण्याची व्यवस्था माजी सरपंच बाबासाहेब तावरे यांनी केली होती.







