वरूळ परिसरात बाजरी व ज्वारी बहरली !
त-हाडी
शिरपूर तालुक्यातील त-हाडी वरुळ परिसरात ज्वारी व बाजरीचे पीक बहरले असून, शेतकऱ्यांना चांगल्या उत्पादनाची अपेक्षा आहे. दरवर्षी पावसाची तूट पाहता शेतकऱ्यांचा कल कमी पावसात आणि कमी खर्चात चांगले उत्पादन देणाऱ्या पिकांकडे वाढला आहे.
त-हाडी वरुळ परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी ज्वारी व बाजरीच्या पिकाची पेरणी
केली आहे. यावर्षी रब्बी हंगामातील पेरणी झाल्यानंतर अतिवृष्टी झाल्याने उगवून आलेल्या उभ्या पिकाची नासाडी झाली. गहू, हरभरा पिकावर वखर फिरवून अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. काही शेतकऱ्यांनी कमी पाण्यात, कमी खर्चात जास्त उत्पादन देणाऱ्या बाजरीच्या पिकाची पेरणी केली होती. ते पीक आता बहरले आहे.
यावर्षी पावसाचे आगमन उशिरा झाल्याने खरीप हंगामाच्या पेरण्या उशिरा झाल्या होत्या. त्यातच मूग, उडदाची पेरणी करता आली नसल्याने ही दोन्ही पिके हातचे गेली. सोयाबीन, कपाशीचे पीक रिमझिम पावसाचे भरवशावर कसे तरी आले होते.दरम्यान, फुलधारणेवेळी अतिवृष्टी झाल्याने उत्पादनात कमालीची घट झाली. त्यातच उरलेल्या पिकाला योग्य प्रमाणात भाव मिळत नसल्याने पेरणीला लागलेला खर्च वसूल झाला
नाही. खरीप हंगाम संपल्यानंत शेतकऱ्यांची मदार रब्बी हंगामावन असते. शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची पेरणी केल्यानंतर अतिवृष्ट झाल्यामुळे उगवून आलेल्या पिकाची नासाडी झाली होती.या पिकावर वखर फिरवून दुबान पेरणी करावी लागली, तर काह शेतकऱ्यांनी गहू, हरभरा पिकाकडे पाट फिरवून कमी पाण्यात, कमी खर्चात जास्त उत्पादन देणाऱ्या बाजरीच्य पिकाची पेरणी केली.सध्या बाजरीचे पीक बहरले असून चांगले उत्पादन होण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.







