मातीपासून विविध वस्तू निर्मिती करणाऱ्या छोट्याबाई सोनवणे ,पारंपरिक व्यवसायातून मिळणाऱ्या पैशाने समाधान
त-हाडी ता. २३ : आपल्या परंपरागत व्यवसायातुन मिळणाऱ्या पैशातून कुटूंब चालवून समाजाला व इतर महिलांना परिस्थितीची जाणीव करून देणाऱ्या ( त-हाडी ता. शिरपूर) येथील छोट्याबाई सुरेशं सोनवणे (कुंभार) ह्या मातीपासून विविध वस्तू निर्मिती करून त्या पैशातून आपल्या कुटूंब चालवत आहेत.
विशिष्ट जात,समाज आला म्हणजे त्यांचा पारंपरिक व्यवसाय, उद्योग, धंदा हा असतोच काही कुटुंब आपल्या परिस्थिती शी मजबूर होऊन आपल्या पारंपारिक व्यवसाय करून कुटूंबाचा उदरनिर्वाह भागवितात. असेच येथील छोट्या बाई सोनवणे ह्यात्यातून गेल्या अनेक वर्षांपासून आपला पारंपरिक व्यवसाय सांभाळून कुटूंबाला आर्थिक हातभार लावत आहेत.
सध्या आधुनिक युगात गॅस, फ्रीज, इलेक्ट्रॉनिक दिवे बाजारात सहजासहजी उपलब्ध होऊन जातात मात्र आजही ग्रामीण भागात चुलीवर स्वयंपाक, पिण्याच्या पाण्यासाठी मातीचे माठ व दीपावली काळात मातीपासून निर्मिती केलेल्या दिव्याचा वापर होत असल्याने, बहुतांश कुंभार समाज बांधव आजही मातीपासून चूल,माठ,रांजण, पणती, दिवे,बैलपोळा साठी माती पासून बैल निर्मिती करून आपल्या पारंपरिक व्यवसाय करून कुटूंब चालवत आहेत.व आजही मातीनिर्मित वस्तूला बाजारात मागणी असल्याचे सौ. छोट्याबाई सोनवणे यांनी सांगितले.







