ग्रामपंचायत सदस्याला सव्वा कोटीची खंडणी मागितली
आटपाडी प्रतिनिधी
दिघंची ता. आटपाडी येथील सागर बाळासाहेब ढोले, व्यवसाय-शेती हे ग्रामपंचायत सदस्य असून यांना राहुल मगर बुधायले यांनी 1 कोटी 25 लाखाची(सव्वा कोटी) खंडणीची मागणी केली असून याबाबत सागर ढोले यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.
सागर ढोले हे ग्रामपंचायत सदस्य असून सदस्यांचे ग्रामपंचायतील कामकाज करतानाचे व्हीडीओ काढून ते व्हायरल करण्याची, धमकी देऊन त्यांचे बदल्यात १.२५ कोटी रुपयांची खंडणीची मागणी केली होती.
राहुल मगर बुधावले याने ग्रामपंचायत कार्यालय येथे काम करत असतानाचे व्हिडीओ रेकॉर्डींग व फोटो काढुन सदर फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची तसेच हे बेकायदेशीरपणे मिळकतीच्या बनावट नोंदी करीत असल्याची बदनामी करण्याची धमकी देवुन त्याआधारे फिर्यादीची आर्थिक लुबाडणुक करण्याचे उददेशाने वेगवेगळे मोबाइल नंबरचे व्हाट्सअप व्दारे १.२५ कोटी रुपयाची खंडणी मागितली आहे. या बाबत सागर ढोले यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास सपोनि जयवंत जाधव, पोहेकॉ. मिसाळ करीत आहेत.