• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

धुळे लोकसभेचा नवीन चेहरा महेंद्र खोंडे निवडणुकीच्या रिंगणात◆ राज्यभरातून कुठल्याच राजकीय पक्षाने नाभिक समाजाला लोकसभेची उमेदवारी न दिल्याने निवडणुकीचा निर्धार ◆

माणगंगा by माणगंगा
March 27, 2024
in महाराष्ट्र
0
धुळे लोकसभेचा नवीन चेहरा महेंद्र खोंडे निवडणुकीच्या रिंगणात◆ राज्यभरातून कुठल्याच राजकीय पक्षाने नाभिक समाजाला लोकसभेची उमेदवारी न दिल्याने निवडणुकीचा निर्धार ◆

धुळे लोकसभेचा नवीन चेहरा महेंद्र खोंडे निवडणुकीच्या रिंगणात


◆ राज्यभरातून कुठल्याच राजकीय पक्षाने नाभिक समाजाला लोकसभेची उमेदवारी न दिल्याने निवडणुकीचा निर्धार ◆

■ त-हाडी प्रतिनिधी :

राज्यांतील लोकसभा निवडणुका ऐरणीवर आलेल्या असतांनाच अत्यंत भावनिक व तितकाच महत्वाचा मुद्दा समोर आला आहे आणि तो म्हणजे महाराष्ट्र राज्यांत नाभिक समाजाची एकूण लोकसंख्या ९० लाखांच्या आसपास असतांना देखील कुठल्याच राजकीय पक्षाने नाभिक समाजाची दखल घेऊन त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्याचे धाडस दाखविले नाही.

किंबहुना नाभिक मतांचा आतापर्यंत केवळ आणि केवळ वापर केला गेला. झेंड्याची काठी उचलल्यापासून ते पोलिसांची काठी खाईपर्यंत नाभिक समाजाला पुढे केले गेले परंतु प्रतिनिधीत्व करतांना मात्र समाजातील राजकीय पक्षांना या कार्यकर्त्यांचा जणूकाही विसर पडल्याचे समोर दिसून आले. म्हणून या प्रकरणाने राज्यभरातील नाभिक समाजामध्ये प्रचंड नाराजीचा सूर उमटल्याचे चित्र दिसत आहे.


सरकारच्या याच धोरणाला व कुटील विषयाला आव्हान देण्यासाठी आता धुळे लोकसभा मतदारसंघातून विकासाभिमुख नेतृत्व असलेला महेंद्र खोंडे हा नवीन चेहरा निवडणूक लढविण्याची माहिती समोर येत आहे. त्यांनी आतापर्यंत आदर्श पत्रकारिता केली असून सामाजिक व राजकीय चळवळीमध्ये सुद्धा ते अत्यंत सक्रीय कार्यकर्ते आहेत.

पत्रकारितेच्या माध्यमांतून त्यांनी कठीण विषयांत हात घालून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. धुळे लोकसभा मतदारसंघात नाभिक समाजाची लोकसंख्या एकूण ७२ हजार आहे तर हीच लोकसंख्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघात एकूण ५० हजार आहे. तरीदेखील या दोन्ही मतदारसंघात सुद्धा नाभिक समाजाला वारंवार डावलले गेल्याचे बघावयांस मिळाले आहे. म्हणून आता आपणही योग्य भूमिका घेतल्याशिवाय पर्याय नाही या उदात्त हेतूने सकल नाभिक समाजाच्या वतीने महेंद्र खोंडे यांचे नाव धुळे लोकसभेसाठी समोर येत असून ते एक उमदं व सर्वसमावेशक विचारांचं नेतृत्व आहे.

तसेच मतदारसंघातील सर्वच भौगोलिक गोष्टींचा त्यांना परिपूर्ण अभ्यास व दांडगा अनुभव आहे. आपल्या धर्मपत्नीला सुद्धा त्यांनी सामाजिक १० वर्षांची बिनविरोध उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष परंपरा झुगारुन निवडणुकीतून मोठ्या दमाने निवडून आणले आहे. म्हणून समाजातून माझे नाव समोर येत असेल तर निश्चितच मी धुळे लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरुन केवळ नाभिक समाजालाच नव्हे तर संपूर्ण मतदारसंघातील जाती-धर्मियांना सोबत घेऊन नाविन्यपूर्ण संकल्पनेतून पुढे नेण्याचा व त्यांचा भौतिक व सर्वांगीण विकास करण्याचा माझा निर्धार असेल अशी ग्वाही नवनियुक्त उमेदवार महेंद्र खोंडे यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. व भविष्यात धुळे सोबतच नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून सुद्धा ते निवडणुकीला सामोरे गेले तरी यांत नवल वाटायला नको अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.

■ महेंद्र खोंडे यांची जमेची बाजू

◆ मतदारसंघात प्रचंड व तगडा जनसंपर्क
◆ सर्व जातीधर्मांशी अतिशय नाळ जुळलेलं व्यक्तिमत्त्व
◆ सर्वच समाजातून व जातींतून लोकाभिमुख व परिचित असलेलं नेतृत्व
◆ अभ्यासू, स्पष्ट, निर्मळ, परखड व सामाजिक गोष्टींचा गाढा अभ्यास
◆ राजकीय परिस्थितीवर कायमच सामाजिक चळवळीतून काम करीत आलेलं नेतृत्व
◆ पत्रकार पेशा असल्याने विषयांच्या खोलांत जाऊन त्याला न्याय मिळवून देण्याची हातोटी
◆ सामाजिक चळवळीच्या माध्यमांतून सर्वच समाजांना न्याय देण्याचा तगडा अनुभव
◆ राजकीय, सामाजिक व सर्वच क्षेत्रांतील लोकांसोबत मैत्रीपूर्ण संबंध असलेला चेहरा

Views: 176
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
सखाराम बोबडे पडेगावकर यांचे कडून एका उमेदवारी अर्जाची खरेदी

सखाराम बोबडे पडेगावकर यांचे कडून एका उमेदवारी अर्जाची खरेदी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)