• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

‘सावित्रीची लेक- आदर्श पुरस्कार’ प्रदान सोहळा -२०२४ उत्साहात

माणगंगा by माणगंगा
March 29, 2024
in महाराष्ट्र
0
‘सावित्रीची लेक- आदर्श पुरस्कार’ प्रदान सोहळा -२०२४ उत्साहात

‘सावित्रीची लेक- आदर्श पुरस्कार’ प्रदान सोहळा -२०२४ उत्साहात

जयसिंगपूर /प्रतिनिधी:


“सावित्रीच्या लेकी” या मासिकाच्या वतीने आयोजित 12 वा ‘सावित्रीची लेक- आदर्श पुरस्कार’ प्रदान सोहळा -२०२४ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. राजेंद्र कुंभार हे होते.
महिलांच्या कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी, त्यांच्यात सांस्कृतिक, आर्थिक,
कौटुंबिक आणि सामाजिक भान निर्माण करण्यासाठी तसेच मनोरंजनाबरोबरच विविध स्पर्धा, उपक्रम प्रशिक्षणातून व्यक्तिमत्व विकास आणि आदर्श नातेसंबंध प्रस्थापित करण्यासाठी ‘सावित्रीच्या लेकी’ हे मासिक गेल्या १३ वर्षापासून कार्यरत आहे.

आपल्या गुणवत्तापूर्ण दर्जेदार अध्यापनातून संस्कारक्षम, यशवंत विद्यार्थी घडविणाऱ्या उपक्रमशिल शिक्षिकांच्या तसेच सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, कृषी, आरोग्य व विविध क्षेत्रातील महिलांच्या कार्याची खास नोंद घेवून ‘सावित्रीची लेक- आदर्श पुरस्कार’ हा मानाचा पुरस्कार देवून महिलांना गौरविण्यात आले.


प्रा. डॉ. मोहन पाटील, समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस, प्रसिध्द गझलकार प्रसाद कुलकर्णी, महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष विलासराव कोळेकर, प्रेरणादायी वक्ते डॉ. अजय मस्के, सिने अभिनेत्री डॉ. पद्मजा खटावकर यांनी मनोगत व्यक्त करून सत्कारमूर्तींना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. तसेच सावित्रीबाईंचा वसा आणि वारसा टिकवण्यासाठी सर्व महिलांनी आगामी काळात प्रयत्न करावेत असे सांगितले. सत्कारमूर्ती महिलांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी क्रांतीबा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले.

मान्यवरांचा सत्कार यावेळी करण्यात आला. ‘आम्ही सावित्रीच्या लेकी’ या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी श्रीमती प्रमिला पाटील, ज्योती सूर्यवंशी, जेनिफर डिसोझा, सरिता कांबळे, अन्वी घाटगे, विद्या शिंदे, अरुणा सूर्यवंशी, पद्मजा सुरवंशी, कांचन पवार, आकांक्षा कुंभार, अर्चना खरोशे, शकुंतला गुरव, सुनीता गवळी, अन्नपूर्णा कोळी, प्रभावती कांबळे- सावंत, वैशाली पाटील, राजेश्वरी बांदेकर, सुमैय्या नायकवडी, शिल्पा यादव, स्वाती चौगुले, गीता भोजणे, वंदना मुसळे, श्रद्धा सुतार, दिपाली जाधव, श्रद्धा कोळी, स्नेहा कोलते, महादेवी कोळी, चंद्रकला पाटील, जयश्री पाटील, गीता कांबळे, प्रियांका कांबळे, मानसी वसगडे, सुष्मिता साळुंखे, संजीवनी माळी, शोभा लोहार, संगीता भावसार, पद्मजा खटावकर, ऐश्वर्या डफळापुरे यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले स्वागत व प्रास्ताविक संजय गुरव यांनी केले.

सूत्रसंचालन सौ. स्वाती भापकर यांनी केले तर आभार मासिकाचे संपादक संजय सुतार यांनी मानले. यावेळी श्रीनिवास देशपांडे, उत्तम सुतार, महेश परीट, अतुल भोजणे, इकबाल इनामदार, राजकुमार नकाते, बाबासाहेब बागडी, अमोल सुतार, बबन जामदार, अजित कांबळे, नंदकुमार सुतार, सौ. मंगल सुतार, सौ. सुप्रभा माळी, बाबासाहेब नदाफ, कनक शहा, दीपक पोतदार आदी मान्यवर उपस्थित होते. कृष्णा हॉल, नांदणी-जयसिंगपूर रस्ता, ता. शिरोळ येथे हा कार्यक्रम झाला.

Views: 172
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
आटपाडी तालुक्यातील वनपरिक्षेत्रातील सर्वच कामे उत्कृष्ट … डॉ. साजणे …जल व मृद जलसंधारणार्थ कामाची केली पाहणी

आटपाडी तालुक्यातील वनपरिक्षेत्रातील सर्वच कामे उत्कृष्ट … डॉ. साजणे …जल व मृद जलसंधारणार्थ कामाची केली पाहणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)