आटपाडी तालुक्यातील वनपरिक्षेत्रातील सर्वच कामे उत्कृष्ट … डॉ. साजणे …जल व मृद जलसंधारणार्थ कामाची केली पाहणी
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी तालुक्यात वनपरिक्षेत्रात सन 2023-2024 साठी मृद व जलसंधारणार्थ कामे (4406-1256) अंतर्गत घरनिकी, घाणंद, जांभूळणी, नेलकरंजी, पारेकरवाडी, पिंपरी बु. लेंगरेवाडी, विभूतवाडी, तळेवाडी, झरे या गावातील वनक्षेत्रामध्ये जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा नियोजन समिती, सांगली यांचेकडील प्रशासकीय मान्यता व निधी वितरण आदेश क्रमांक 2894 दिनांक 14.03.2024 अन्वये चेकडॅम, गँबियन बंधारा, सलग समतल चर, मातीनाला बांध इत्यादी कामाचे अनुदान वाटप झाले आहे. त्यानुसार सदर कामाचे बी 1 निविदा झालेली असून मंजूर निविदा धारक यांचेकडूनच वनक्षेत्रात काम करण्यात येत आहे .असे वनक्षेत्रपाल अशोक खाडे.यांनी सांगितले.
सदरची कामे ही वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी .डॉ.श्री. अजित साजणे, सहाय्यक वनसंरक्षक वनीकरण सांगली यांनी दिनांक पहाणी केलेली असून त्यामध्ये कोणतीही अनियमितता दिसून येत नाही. सदरची कामे ही गुणवत्तापूर्ण व व्यवस्थितरित्या चालू असल्याचे वरीष्ठ अधिकारी यांनी खात्री केलेली आहे. सदरची कामे उत्कृष्टरित्या आहेत असेही डॉ. साजने म्हणाले.
तसेच मिळालेल्या माहितीनुसार सदर टेंडर प्रक्रिया ही जिल्ह्यामध्ये खानापूर ,जत ,तासगाव तालुक्यामध्ये ज्या प्रकारे राबविली आहे त्याच प्रकारात आटपाडी तालुक्यात टेंडर प्रक्रिया राबवलेले आहे. सदर टेंडर हे रीतसर पेपरला बातमी देऊन टेंडर काढण्यात आलेले होते.
तालुक्यामध्ये सध्या वन विभागातून कामे सुरू आहेत ती कामे उत्कृष्ट दर्जाची असून चांगल्या पद्धतीने कामे सुरू आहेत .परंतु काही नागरिकांनी विनाकारण तक्रार करून ही कामे निष्कृष्ट दर्जाचे आहेत असे म्हंटले आहे. प्रत्यक्षात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कामाची पाहणी केली असता सर्व कामे उत्कृष्ट दर्जाचे आहेत असे निदर्शनाला आले.