एप्रिल हिट :सुर्य आग ओकु लागला ; सावल्या हरवल्या,शितपेयावाल्यांची चांदी, कुलर दुरुस्तीसाठी लागली रीघ
उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच गर्मीने नागरिक हैराण
त-हाडी- प्रतिनिधी
यावर्षी उन्हाळ्याचा सुरुवातीलाच उष्णतेची भयानक लाट आलेली असून तापमाने रुद्र रूप धारण केलेले असल्याने मार्च ऍण्डींग मार्च हिट ठरला असून सूर्यनारायण आग ओकू लागल्याने सर्वसामान्यांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. यंदाच्या मोसमातील या हप्त्यात तापमान अधिक वाढल्याने शितपेयांच्या दुकानामध्ये गर्दी वाढलेली असून घरातील कुलर, पंखे एसी सह आदी गर्मी पासुन संरक्षण मिळणाऱ्या वस्तु दुरुस्ती, तथा नविन वस्तु खरेदीसाठी इलेक्ट्रिक तथा इलेक्ट्रॉनीकच्या दुकानांमध्येही ग्राहकांची रीघ लागली आहे .
तसेच शहरातील विविध चौकात तथा सार्वजनिक ठिकाणी शितपेयाची दुकाने थाटलेली असुन यात रसवंती,मावा कुल्फी,ज्युस,लस्सी,आईस गोळा,आईस्क्रीम यासह विविध शितपेयाची मागणी वाढलेली असुन नरड्याची कोरड भागविण्यासाठी नागरीकांचा याकडे कल वाढलेला आहे.यामुळे शितपेयावाल्यांना अच्छे दिन आल्याचे दिसत आहे.
तसेच घरातील कुलर पंखे सुधारण्यासाठी इलेक्ट्रिक च्या दुकानांमध्ये ही ग्राहकांची रीघ लागली आहे .
या कडक उन्हाच्या लाटेमुळे अबालवृद्धांची पुरती दमछाक झाल्याचे दिसून येत आहे. रस्ते सामसूम असून लग्न सराई असताना सुद्धा बाजारपेठामध्ये शुकशुकाट आहे.तालुका वासियांसाठी दरवर्षी येणारा उन्हाळा तसा नवा नाही. मात्र यंदा उन्हाने सुरुवातीलाच ३८ डिग्री सेन्शियस तापमानाची मर्यादा ओलांडली असून तापमानाची वाटचाल चाळीसी पार डिग्रीकडे जाताना दिसून येत आहे
कडक उन्हामुळे सर्वसामान्य जनता जाम वैतागले आहेत. रस्ता विकासाअंर्तगत चालु असलेल्या कामामुळे हरवलेल्या सावल्या व काम चालु असल्यामुळे उडणारे धुळीचे लोट या सर्व प्रकारांना प्रवाशी जाम वैतागले असुन यातच लग्न सराईसाठी बाहेरगावी जातांना चेहरा व कपडे धुळीमुळे पार विद्रुप दिसत आहे . सावली शोधुन मिळत नाही उन्हामुळे दुचाकी पंम्चर होण्याचे प्रमाण वाढत आहे . उन्हात दुचाकी उभी राहिल्यास सिट गरम होते व प्रवास करतांना खुप त्रास होतो . शासकीय कार्यालयातील कामकाजावरसुद्धा मोठा परिणाम झाला आहे. अनेक शासकीय कार्यालयांमध्ये कामासाठी येणाऱ्या नागरिकांची वर्दळ कमी झाली आहे. सकाळी आठ वाजता सुरु झालेले ऊन सायंकाळी साडेसहा वाजले तरी कमी होण्याचे नाव घेत नसल्याने नागरिकांना चटके सहन करत दैनंदिन कामकाज करणे भाग पडत आहे.
घराबाहेर पडतानाच सर्वसामान्य ग्रामस्थांना डोक्यावर टोपी घालून बाहेर पडावे लागत आहे. अंगात पांढरा पोशाख व डोळ्यावर गॉगल घालून बाहेर पडने अनेक जण पसंत करत आहेत त्यामुळे गाँगल,रुमाल,स्कार्प,सुती कपड्यांची मागणीही वाढली आहे तर अति गर्मीने वृद्ध व लहान मुलांची सर्वाधिक दमछाक होत आहे. काहीजण छत्री तर काहीजण पांढऱ्या मोठा रूमालाचा आधार घेताना दिसून येत आहेत.
दरम्यान, या उष्णतेच्या लाटेचा परिणाम ग्रामीण भागात सर्वाधिक जाणवत आहे. शेतीची कामे उन्हामुळे सकाळच्या सत्रातच आटोपली जात आहेत. शेतावर कामावर जाणाऱ्या शेतमजुरांनीसुद्धा आपल्या कामाच्या वेळा बदलल्या असून सकाळी सहा ते दुपारी ११ वाजेपर्यंतच कामाला प्राधान्य देण्यात येत आहे. या पुढील तिन महिने अखेरपर्यंत उष्णता चांगलीच राहण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला असून तालुक्यातील बोटावर मोजण्या इतपत गावे वघळता अ अख्या तालुक्यात जल संकट आ असुन उभे आहे . तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये पाणी टंचाई भेडसावणार या भितीने अनेक जण भयभित दिसुन येत आहे . उन्हाळ्याचा शेवट लहान मुले व वृध्दांना खुपच जिकरीचा जाणार असे दिसते . त्यासाठी उन्हाचा चढता पारा पाहता आवश्यक तेव्हांच घराबाहेर पडावे . बाहेर जातांना काळजी घ्यावी . सोबत पाणी बॉटल असू दयावी . शकतो पांढऱ्या रंगाचा पातळ खादी पोशाख वापरावा . आणि उष्माघाताचा धोका टाळावा असे अवाहन आरोग्य चिकीत्सक वारंवार करत आहे .
प्रतिक्रीया
गत वर्षीपेक्षा या वर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच कमालीची गर्मी होत आहे व ऐन कडाक्याच्या उन्हाळ्यात रमजान महिना सुरू असल्याने रोजेदारांना थंड वातावरण हवे असल्याने ग्राहक गर्मीपासून सुटका करणसाठी आपआपल्या घरातील कुलर ,पंखे ,एसी सह थर्मास, फ्रीज, यासह विविध वस्तुची दुरुस्ती तथा या वस्तु नविन खरेदी करीत आहे गेल्या हप्त्याभरापासून या वस्तु दुरुस्तीसाठी दुकानात गर्दी होत असून दोन कामगार व मी स्वतः दुरुस्तीचे काम करीत असून देखिल कामातून फुरसत मिळत नाही यामुळे आमच्या उत्पन्नात देखिल कमालीची वाढ झालेली आहे .
महेंद्र परदेशी- कुलर पंखे दुरुस्त्या करणारे व्यावसायिक बसस्थानक त-हाडी
उन्हाळ्याच्या सुरुवातीला च उष्णतेने रुद्र रूप धारण केल्याने इलेक्ट्रॉनिक्स व इलेक्ट्रॉनिक्स च्या दुकानावर गर्मी पासून संरक्षण मिळावे यासाठी कुलर पंखे दुरुस्ती तथा खरेदी करण्यासाठी ग्राहकांची रिघ लागली आहे







