• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

उष्माघाताला आळा घालण्यासाठी मातीच्या मडक्यातले पाणी फायदेशी….रवॉटर फिल्टरच्या जमान्यातही मडक्यांना मागणी कायम

माणगंगा by माणगंगा
April 9, 2024
in महाराष्ट्र
0
उष्माघाताला आळा घालण्यासाठी मातीच्या मडक्यातले पाणी फायदेशी….रवॉटर फिल्टरच्या जमान्यातही मडक्यांना मागणी कायम

उष्माघाताला आळा घालण्यासाठी मातीच्या मडक्यातले पाणी फायदेशीर

वॉटर फिल्टरच्या जमान्यातही मडक्यांना मागणी कायम

त-हाडी-

पिण्याच्या पाण्यापासून होणारे विविध आजार टाळण्यासाठी वॉटर फिल्टरसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार चांगला असला, तरी घराघरात मातीच्या मडक्यांना आजही तेवढीच मागणी असल्याचे चित्र सर्रास पहावयास मिळत आहे. शिरपूर शहरासह ग्रामीण भागातही वॉटर प्युरिफायर घरोघरी पोहोचले आहेत.
मात्र मडक्यातील पाणी चवदार असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. उन्हाच्या झळा वाढू लागल्याने मडक्यांची दुकानेही बाजारात व रस्त्या रस्त्यावर थाटली आहेत. आकारानुसार मडक्यांच्या किमतीत बदल आहेत. त्यामुळे खरेदीची धूम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. गेल्या आठवड्यापासून तापमानात
मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून गेल्या दोन-तीन दिवसांत उन्हाचा पारा जास्तच चढला आहे. त्यामुळे थंड पाण्याची गरज भासू लागली आहे. विशेषत दुपारी उन्हाची तीव्रता जाणवत आहे. परिणामी मातीच्या मडक्यांनाही मागणी वाढल्याचे चित्र आहे. अनेक घरांमध्ये फ्रीज असले तरी मडक्यांची जागा ही कायम आहे. ‘जुने ते सोने’ ही म्हण प्रचलित आहे.
उन्हाच्या दाहकतेपासून वाचविण्यासाठी मातीच्या मडक्यातील पाण्यानेच तहान मिटते. उन्हाळ्यात तहान लागल्यावर थंड पाणी पिण्याची तीव्र इच्छा होते. यावेळी बहुतेकजण फ्रीजमधीलच पाणी पितात. मात्र, देशी फ्रीज म्हटल्या जाणाऱ्या मडक्यातील पाण्याची चवच काही निराळीच असते. मडक्यातील पाणी हे आरोग्यासाठी चांगले असते. यात अनेक रोगांशी लढण्याची ताकद असते. उष्माघाताला आळा घालण्यासाठी मातीच्या मडक्यातले पाणी फायदेशीर असते. तसेच मातीत मुबलक मिनरल्स आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऊर्जा असते. याचा आरोग्यासाठी चांगलाच फायदा होतो यामुळे आरोग्याचा विचार करून या मातीच्या मडक्यांची मागणी होऊ लागली आहे. आरोग्य आरोग्य तज्ज्ञांच्या मते फ्रीजचे पाणी आरोग्यासाठी त्रासदायक ठरते. मातीच्या मडक्यांचे पाणी पिण्यास शरीरासाठी अधिक लाभदायक असल्याचे जाणकार सांगत आहेत

चौकट

मडक्यामध्ये पाणी ठेवल्यास त्यात नैसर्गिकरीत्या मॅग्नेशियम, पोटॅशियम ही खनिजे असतात. त्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते. उष्माघात होण्यापासून बचाव होतो. माठ नैसर्गिकरीत्या थंड पाणी ठेवतो. उन्हाळ्यात सर्वांनी मडक्यातील पाणी प्यायल्यास आरोग्यास हितकारक राहतं आहे

चौकट

मडक्यांच्या किमतीत 20 ते 25 टक्के वाढ

यंदा बाजारात मडक्यांच्या आकारानुसार 200 ते250 रुपये, तोटी रांजण मडके 500 ते 600 रुपये आहेत. साहित्याचे दर वाढल्याने माठाचे दर वाढत आहेत. महागाई प्रचंड वाढत आहे त्यामुळे काळ्या मडक्याचे भावही गगनाला पोहोचले आहेत. प्रत्येक गावात 10 ते 15 कामगार काम करीत आहेत. गावात फिरून दिवसाला 15 ते 20 माठ प्रत्येक कामगार विकत आहे. ते विकून त्यांना 25 ते 30 रुपये प्रत्येक मडक्यांमागे मिळतात. हे मडके 150 रुपयांपासून 250 रुपयांपर्यंत विक्रीस आहेत. कोळसा व मातीचे भाव वाढल्यानेच मडक्यांचे भाव वाढले आहेत. मागच्या वर्षापेक्षा यंदा मडक्यांच्या किमतीत 20 ते 25 टक्के दराने वाढ झाली आहे

Views: 217
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
लोकशाही बळकट करण्यासाठी निस्वार्थीपणे मतदार करातऱ्हाडी येथे मतदान जनजागृती रॅली काढून केले आवाहनसहाय्यक गट विकास अधिकारी सुवर्णा पवार

लोकशाही बळकट करण्यासाठी निस्वार्थीपणे मतदार करातऱ्हाडी येथे मतदान जनजागृती रॅली काढून केले आवाहनसहाय्यक गट विकास अधिकारी सुवर्णा पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)