प्रतिनिधी…सांगली/आटपाडी
आटपाडी तालुक्यासाठी वरदान ठरलेली टेंभू योजना. या टेंभू योजनेची निर्मिती होऊन बरेच वर्षे झाली.टेंभु योजनेची निर्मिती झाल्यापासून अनेक लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका झाल्या या निवडणुकीमध्ये टेंभूच्या नावाचा जागर करूनच सर्वच नेत्यांनी मते मिळवली .
परंतु अद्याप टेंभू योजना पूर्ण झाले नाही.
टेंभू योजना पूर्ण न झाल्याने आटपाडी तालुक्यासह अन्य तालुके दुष्काळाच्या छायेत आहेत .दुष्काळाचे चटके सोसत आहेत. चाऱ्याअभावी व पाण्याअभावी अनेक मेंढपाळांना व गुरेढोरे सांभाळणाऱ्या शेतकऱ्यांना स्थलांतर करावे लागत आहे. आणखी दुष्काळाच्या यातना किती दिवस शेतकरी, मेंढपाळ यांनी सोसयच्या आहेत.
दरवर्षीच पावसाळ्यामध्ये मेंढपाळ आणि आपापल्या गावाकडे यायचे दिपवाळीनंतर चाऱ्या व पाण्याअभावी पुन्हा पानस्थळी नदीकाठी स्थलांतर करायचे हे पूर्वीपासून चालत आले आहे. अशा मेंढपाळांचे स्थलांतर बंद कधी होणार ? मेंढपाळांना आपापल्या गावातच मुबलक चारा कधी मिळणार ?टेंभू येण्याचे काम आणखी किती निवडणुका पाहणार आहे. हेही समजायला मार्ग नाही.
1995 मध्ये युतीचे सरकार आले व तालुक्याचे अपक्ष आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी आटपाडी तालुक्याला पाणी मिळावे या अटीवर युतीच्या शासनाला पाठिंबा दिला होता. तर स्वर्गीय अनिलभाऊ बाबर यांनी पूर्वीपासूनच टेंभूचे पाणी तालुक्याला येण्यासाठी प्रयत्न केले होते. तर आमदार बाबर यांना पाणीदार आमदार म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या काळामध्ये काही गावांमध्ये पाणी आले परंतु संपूर्ण तालुक्यामध्ये पाणी आले नाही.
मध्यंतरच्या काळात टेंभूचे काम बंद होते.त्यावेळेला आम.गोपीचंद पडळकर यांनी माजी आमदार राजेंद्र देशमुख यांच्या समवेत टेंभू योजनेच्या कार्यालयात अधिकाऱ्यासमवेत बैठक आयोजित केली होते .परंतु या बैठकीमध्ये समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याने आमदार गोपीचंद पडळकर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाची तोडफोड केली होती.
तर नागनाथअण्णा नायकवडी यांनी तर आटपाडी तालुक्यांमध्ये टेंभूचे योजनेच्या पाण्यासाठी तंबू ठोकून तळ ठोकला होता .अनेक मेळावे घेतले आणि चळवळ उभा केली ,साखळी उपोषण केले व प्रदीर्घ असा लढा चालू ठेवला होता. त्यानंतर नवनाथ अण्णा नायकवडी यांच्या निधनानंतर डॉ.भारत पाटणकर यांनी हा लढा पुढे चालू ठेवला आहे.आणि सध्या हा लढा सुरूच आहे .परंतु अद्याप तालुक्यातील संपूर्ण गावे ओलीता खाली आली नाहीत .अनेक गावे पाण्यापासून वंचित राहिलेली आहेत .या गावांना पाणी कधी येणार या गावांचा दुष्काळ कधी हटणार चाऱ्यासाठी गुराढोरांना घेऊन स्थलांतर करावे लागत आहे, हे कधी थांबणार असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांकडे आहेत.
सध्या जरी टेंभू योजनेला मंजुरी मिळाली असली तरी कामे सुरू होण्यासाठी होती पूर्ण होण्यासाठी आणखी किती वर्षे लागतील हे सांगता येत नाही तर आणखी किती निवडणुकीमध्ये टेंभूच्या नावावर मताचा जोगवा घेणार आहेत हेही अद्याप सांगता येत नाही.
तसेच तालुक्याचा दुष्काळी कलंक कधी मिळणार मेंढपाळांचे स्थलांतर कधी थांबणार गुराढोरांना चारा कधी मिळणार व येथील शेतकरी कधी सुखी होणार हा ही गंभीर प्रश्न आहे आणखी किती निवडणुकीमध्ये टेंभू योजनेच्या नावाचा जागर होणार आहे . असे अनेक प्रश्न तालुक्यातील शेतकऱ्याकडे पडले आहे.
सर्वच राजकीय नेत्यांनी लोकसभा, विधानसभा ,पंचायत समिती ,जिल्हा परिषद या निवडणुकीमध्ये आतापर्यंत टेंभूच्या नावाचा वापर करून मतदानाच्या जोगवा घेतला आहे .परंतु सध्या मतदार, शेतकरी जागृत झाला आहे .त्यामुळे पुढील काळामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये टेंभूचा जागर चालणार नाही .प्रत्यक्षात कामच पूर्ण करावे लागणार आहे .तर आणि तरच प्रयत्न करणाऱ्या नेत्यांना मतदान मिळणारा आहे.
चौकट.
सर्वच राजकीय नेत्यांनी खरोखर मनापासून प्रयत्न करून तालुक्याचा पाण्याचा प्रश्न मिटवावा. दरवर्षीच दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत .त्या दुष्काळाच्या झाडा संपवाव्यात. व संपूर्ण तालुका ओलिताखाली आणावा अशी प्रत्येक शेतकऱ्यांची अपेक्षा आहे
.
२.. सततच्या दुष्काळामुळे नागरिकांच्या जनजीवनावर व विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर हे परिणाम झाला आहे. सततच्या दुष्काळामुळे आर्थिक उत्पन्नाचे साधन नसल्याने मुलांच्या शिक्षणाचा खर्च शेतकरी पेलु शकत नाहीत .त्यामुळे पुढील पिढीचे सुद्धा या दुष्काळामुळे अतोनात नुकसान होणार आहे.







