पक्षनिष्ठा काय असते ही निमगावच्या के के पाटील यांच्याकडुन शिकली पाहिजे
पिलीव प्रतिनिधी –
माढ्यात जानकर -मोहिते पाटील मनोमिलणामुऴे भाजपा घायाऴ झाली असली तर निमगावचा वजनदार नेता केके पाटील यांनी मैदान सोडले नाही.केके पाटील यांच्या कडे पाहुन आज बाजीप्रभू देशपांडे यांची पावनखिंड आठवत आहे. शत्रुंनी वेढा टाकला तरी दोन्ही हातात तलावरी घेऊन बाजीप्रभू लढले लढताना मुंडके छाटले तरीही हात चालु होते
तलावारी फिरवत होते बाजींच्या तोंडातून एकच शब्द निघत होता. अरे यमा थोडावेऴ थांब माझा राजा गडावर पोचला की तोफेचा आवाज होईल मग मला खुशाल घेऊन जा जोपर्यंत तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही. हीच कहाणी आता मगराचे निमगाव येथील माजी जिल्हा परिषद सदस्य केके पाटील यांच्याशी तंतोतंत लागू होत आहे.
आज माऴशिरस तालुक्यातील मोहिते पाटील कुटुंबाला भाजपने विधानपरिषद दिली.बंद पडलेल्या संस्था चालु करण्यासाठी मदत केली त्याच मोहीते पाटील यांना भाजपचा घात केला आणि पक्षाला सोडचिठ्ठी देऊन तुतारीतुन आपली चुल मांडली. तालुक्यातील दुसरे वजनदार नेते उत्तमराव जानकर यांनीही भाजपला राम राम ठोकत आपले कट्टर प्रतिस्पर्धी मोहीते पाटील यांच्याशी हातमिळवणी केली मात्र केके पाटील सारख्या निष्ठावंत भाजपच्या कार्यकर्त्यांने आता निमगाव,पिलीव गटातील सुत्रं हातात घेऊन प्रतिस्पर्ध्यांशी कडवी झुंज देत आहेत
दिवसातील आठरा तास हा माणूस पक्षासाठी तहानभुख विसरुन काम करत आहे. एक एक माणूस जोडत आहे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सोबत रामायणातील लक्ष्मणासारखा निमगावचा हा छावा खंभीरपणे पाठीशी आहे. राजकारणात जय पराजय होत राहतो पण पक्षावर प्रेम करणारा मात्र लक्षात येतो.भाजपमध्ये अशा लोकांचे भविष्य मात्र उज्ज्वल असते हा भाजपचा आजपर्यंतचा इतिहास आहे. सत्तेसाठी रोज एका पक्षात उड्या मारणाराचा वापर हा भाजीतील कडीपत्ता सारखा असतो हा निसर्ग नियम आहे.







