भोरखेडा पटेल विद्यालयात विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी
शिरपूर तालुक्यातील आर सी पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भोरखेडा येथे मुकेशभाई पटेल चॅरिटेबल ट्रस्ट अस्तित्व शिरपूर अंतर्गत संचालिका द्वेता भुपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांचे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
प्रथम प्राचार्य आर एफ शिरसाठ यांनी शिबिराचा उद्देश ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना होणारे डोळ्यांचे विकार दूर होऊन त्यांना अभ्यासात अडचण येऊ नये तसेच त्यांच्या कुटुंबला मदत व्हावी असा आहे या नेत्र तपासणी साठी शिरपूर उपजिल्हा रुग्णालय चे नेत्रतंज्ञ डॉ दिपक जाधव,डॉ वरुण चौधरी तसेच गोपाल माळी उपस्थित होते त्यांचे स्वागत प्राचार्य आर एफ शिरसाठ व पर्यवेक्षक आर आर महाजन यांनी केले.
डॉ दिपक जाधव यांनी विद्यार्थ्यांना निरोगी डोळे कसे ठेवावे,डोळ्यांची काळजी कशी घ्यावी तसेच डोळ्यांचे विकार म्हणजे काय याविषयी माहिती दिली नंतर इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंतच्या १६० विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली. प्रास्ताविक व सूत्रसंचालन एन वाय बोरसे यांनी केले
आभार पर्यवेक्षक आर आर महाजन यांनी मानले शिबिर यशस्वी करण्यासाठी एम जी वाडीले,व्ही एस ईशी,पी टी चौधरी, एस आर देसले,एस एम पाटील,एन डी चव्हाण, आर जी पाटील, व्ही डी पाटील,मिना पटेल, जे डी पाटील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले