कोल्हापूर दि . २२( माणगंगा प्रतिनिधी कमल धडेल )
जोतिबा डोंगरची सलग दुसर्या ही वर्षी कोराना महामारीच्या पार्श्वभुमीवर श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारी (दि.२३ ) निघणारी नगर प्रदक्षिणा मोजक्याच मानकर्याच्या उपस्थितीत निघणार आहे . भाविकांना सोमवार या दिवशी जोतिबा डोंगरावर प्रवेश बंदी असणार आहे .
भाविकांनी जोतिबा डोंगरावर येणाचा प्रयत्न करु नये असे आवाहन पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. कोडोली पोलीस ठाण्याच्या वतीने कडेकोट बंदोबस्त असणार आहे. डोंगराकडे येणार्या सर्व वाटा बंद केल्या जाणार आहेत. गावातील १० गावकरी, दिंडीचे मानकरी, शेजारती आरतीचे पुजारी, भजनी मंडळ , डवरी, कोडोली पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक दिनेश काशिद, देवस्थान इनचार्ज महादेव दिंडे यांच्या उपस्थिती झालेल्या बैठकीत नगरप्रदक्षिणा मोजक्याच पुजाऱ्याच्या उपस्थिती त सोहळा पार पाडण्याचा निर्णय घेण्यात आला .
चार धाम यात्रा केल्याचे पुण्य मिळवून देणारी जोतिबा डोंगरची नगरप्रदक्षिणा सलग दुसऱ्या वर्षी रद्द झाली आहे. या नगर दिंडीमध्ये पश्चिम महाराष्ट्रासह मुंबई , पुणे भागातील जवळपास दोन लाख भाविक सहभागी होत असतात. सकाळी ९ ते सांयकाळी ७ या १० तासामध्ये ३० कि.मी. अनवाणी जोतिबा डोंगर ची सभोवती प्रदक्षिणा पूर्ण करून बारा ज्योतिर्लिग , अष्ट तीर्थांचे दर्शन घेतले जाते .







