दिघंची निंबाळकर तलावात टेंभूचे पाणी दाखल
आमदार अनिल भाऊ बाबर व तानाजीराव पाटील यांनी दिलेला शब्द पूर्ण केला – सरपंच अमोल मोरे
गेली अनेक दिवसापासून टेंभू योजनेच्या पाण्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागून राहिली होती अखेर 23 ऑगस्ट रोजी टेंभू योजनेचे पाणी बंद पाईपलाईन मधून दिघंची मधील निंबाळकर तलावात दाखल झाले आणि शेतकऱ्यांनी एकच जल्लोष केला अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर टेंभूचे पाणी शिवारात दाखल झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले तर आमदार अनिल भाऊ बाबर आणि तानाजीराव पाटील यांनी दिलेला शब्द पूर्ण करत दिघंची भाग सुजलाम सुफलाम करण्याचा करण्याचे वचन पूर्ण केल्याची भावना सरपंच अमोल मोरे यांनी व्यक्त केली.
मागील वर्षी तीव्र पाणीटंचामुळे शेनवडी येथील वाड्यातून मिसाळ वस्ती तलाव मार्गे दिघंची निंबाळकर तलावात पाणी सोडण्यात आले होते त्यानंतर युद्धपातळीवर बंद पाईपलाईनचे काम करून ही पाईपलाईन निंबाळकर तलावापर्यंत पूर्ण करण्यात आली व 23 ऑगस्ट रोजी टेंभूचे पाणी बंद पाईपलाईन मधून निंबाळकर तलावांमध्ये दाखल झाले आहे. टेंभूच्या पाण्यासाठी दिघंची मधील शेतकऱ्यांना गेली अनेक वर्षे प्रतिक्षा करावी लागली टेंभू योजनेमध्ये सुरुवातीला दिघंची चा समावेश नव्हता परंतु आमदार अनिल भाऊ बाबर व तानाजीराव पाटील यांनी दिघंची गावचा समावेश टेंभू योजनेमध्ये करून बंदिस्त पाईपलाईन च्या लाभ क्षेत्रामध्ये दिघंची चे नाव घालून शासन स्तरावर पाठपुरावा करून दिघंचीसाठीची बंदिस्त पाईपलाईन मंजूर करून घेतली.
हा दुष्काळ शेवटचा दुष्काळ असेल असा शब्द आमदार अनिल भाऊ बाबर व तानाजीराव पाटील यांनी नागरिकांना दिला होता तो शब्द आमदार अनिल भाऊ बाबर व तानाजीराव पाटील यांनी पूर्ण केला असल्याचे मत दिघंची चे सरपंच अमोल मोरे यांनी व्यक्त केले तसेच टेंभूच्या पाण्यामुळे या भागातील शेती पुन्हा एकदा बहरेल दिघंची ची बाजारपेठ पुन्हा एकदा फुलेल व याचे सर्व श्रेय आमदार अनिल भाऊ बाबर व तानाजीराव पाटील यांना आहे. शेतकऱ्यांना दिलेला शब्द आमदार अनिल बाबर व तानाजिराव पाटील यांनी पूर्ण केल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला असल्याचे मत देखील सरपंच अमोल मोरे यांनी व्यक्त केल
बंदिस्त पाईपलाईन झरे येथून दिघंची पर्यंत आहे परंतु मागील वर्षी तीव्र पाणीटंचाई वेळी पाणी सोडल्यानंतर रात्री-अपरात्री दिघंची मधील नागरिक शेतकरी तसेच ग्रामपंचायत चे पदाधिकारी स्वतः सरपंच अमोल मोरे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला वेळप्रसंगी झरे येथील पाईप लाईन जवळ पहारा देण्यात आला रात्रंदिवस कामाची पाहणी करण्यात आली आणि अखेरीस दिघंची निंबाळकर तलावात कृष्णेचे पाणी बंद पाईपलाईन मधून दाखल झाले आहे वारंवार पडणारा दुष्काळ, कमी पर्जन्यमान या सगळ्या बाबींमुळे शेती अडचणीत आली होती पर्यायाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके पाणी नसल्याने वाया जात होती त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक व मानसिक नुकसान होत होते परंतु टेंभू योजनेचे पाणी बंदिस्त पाईपलाईन मधून आल्याने दुष्काळाचा कायमचा विषय संपला असून दुष्काळी भाग हा डाग पुसून गेला आहे त्यामुळे पाण्याअभावी पिकांचे होणारे नुकसान यापुढे होणार नसल्याने शेतकऱ्यांनी जल्लोषपूर्ण वातावरणात आनंद व्यक्त केला .







