जालना शहरातील अनेक युवकांचा प्रहार युवा आघाडी मध्ये प्रवेश !!
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७
जालना: आज जालना येथील शासकीय विश्राम ग्रह 488 येथे राज्यमंत्री नामदार बच्चू भाऊ कडू यांच्या विचार व कार्यपद्धती वर प्रेरीत होऊन आज विदूर भाऊ लाघडे यांच्या उपस्थितीत व युवा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब काळवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आज जालना शहरातील असंख्य युवकांचा प्रहार मध्ये प्रवेश केला आहे.
आज दि. 29 आॅगस्ट 2021 रविवारी रोजी शासकीय विश्रामगृह जालना येथे मयुर गोफणे व अजय कावळे यांच्या सह अनेक युवकांनी प्रहार जालना युवा आघाडी मध्ये प्रवेश केला आहे. यावेळी गणेश जाधव, राम घायाळ, विठ्ठल आघाडी, सुरेश दशरथ, दिनकर शेळके, संतोष मरमट, संदेश कुलकर्णी, अमर शिंदे, विनोद डोंगरे, मस्जिद शेख, आदींनी प्रवेश केला.
यावेळी विदूर भाऊ लाघडे (जिल्हाध्यक्ष जालना), बाळासाहेब काळवणे (युवा जिल्हाध्यक्ष जालना), नरेश वाडेकर, आकाश थेटे युवा तालुकाध्यक्ष अंबड, कैलास आेळेकर युवा तालुकाध्यक्ष बदनापूर, जुबेर पटेल आदी प्रहार चे पदाधिकारी उपस्थित होते.







