संस्धामाता सुशिलादेवी साळुंखे यांचा आदर्श घ्यावा—प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख
——————————————
उस्मानाबाद(प्रतिनिधी)दि.४
आपल्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक,शिक्षणमहर्षी डाॅ.बापूजी साळुंखे यांच्या सहचारिणी,संस्थामाता सुविलादेवी साळुंखे यांनी एका ध्येयाने प्रेरित होत डाॅ.बापूजी साळुंखे यांचा संपूर्ण वेळ संस्थेच्या कारभारात व शिक्षणाच्या प्रचारात आणि प्रसारात जात असल्याने, कुटुंबाची धुरा सांभाळत त्यांनी मुलावर चांगले संस्कार केले व संस्थेतील भेटायला येणा—या गूरूदेव कार्यकर्त्यास त्या मायेने बोलत. येवढ्या मोठ्या संस्थेच्या असतानाही त्या साधेपणाने रहात. शिक्षण प्रसारात संस्थेच्या बोर्डिंगच्या मुलांना जेऊ घालण्यासाठी जेंव्हा डाॅ.बापूजीकडे पैसे नसत तेंव्हा गळ्यातील सोने विकुन मुलांच्या जेवणाची सोय करत त्या ध्येयवेढ्या व त्यागीमय जीवन जगत होत्या. त्यामुळेच त्या संस्थामाता ठरल्या आहेत
.आशा संस्थामातेचा त्याग आजच्या शिक्षकांनी व महिलांनी आठवावा व त्यांचा आदर्श घ्यावा असे प्रतिपादन ४सप्टेंबर रोजी, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या संस्थामाता,सुशिलादेवी साळुंखे यांच्या ९४व्या जयंती निमित्त बोलतांना रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांनी प्रतिपादन केले आहे. यावेळी प्राचार्य यांचे हस्ते संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांच्या प्रतिमाचे पुजन करण्यात आले.यावेळी महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील गुरूदेव किर्यकर्त्यांनी व शिक्षकेत्तर कर्मचारी व सेवक यांनी त्यांचे प्रतिमेला अभिवादन केले.पुढे बोलताना डाॅ.जयसिंगराव देशमुख म्हणाले की,संस्थामाता या चांगल्या सुसंस्कारित घराण्यातील असल्याने बोलण्यापेक्षा प्रत्येक्ष काम करणा—या होत्या त्यामुळे कांही दिवस त्यांनी संस्थेचे कार्याध्यक्षपद ही सांभाळलेले होते.त्यागीमय जीवन कसे असावे याचे मुर्तीमंत ऊदा.म्हणजे संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे आहेत त्यांचाच आदर्श घेऊन आपण सुसंस्कारित विद्यार्थी घडवावेत अस त्यांनी आवाहन केले.यावेळी प्रा.डाॅ.शांतीनाथ घोडके,उपप्राचार्य प्रा.बबन सूर्यवंशी उपस्थित होते.
यावेळी महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी,सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूञसंचालन व आभार प्रा.डाॅ.के.एम.क्षीरसागर यांनी मानले.







