क्रीडा प्रशिक्षक विजय तिकोटी ‘क्रीडाभूषण’ पुरस्काराने सन्मानित
माणगंगा न्यूज पोर्टल जत:
जत (जि.सांगली) येथील राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक विजय तिकोटी यांना मेजर ध्यानचंद केंद्रीय क्रीडा परिषद,नवी दिल्ली,भारत यांच्याकडून देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय ‘क्रीडाभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अनेक क्रीडा प्रशिक्षक व विद्यार्थ्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.हा पुरस्कार सोहळा बालगंधर्व नाट्यगृह ,मिरज येथे पार पडला.राष्ट्रीय कराटे क्रीडा प्रशिक्षक तिकोटी यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.हा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम पालकमंत्री जयंतराव पाटील ,महापौर दिग्विजय सूर्यवंशी,जिल्हा नियोजन समिती सदस्य संजय बजाज,शहर जिल्हा अध्यक्ष (राष्ट्रवादी युवक काँग्रेस) राहुल पवार या मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. पुरस्कारचे मानकरी ठरलेल्या सर्वांचे कौतुक होत आहे.







