*संस्थाध्यक्ष कल्याणीताई नेवसे यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा*
मिरजगाव : संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान, मिरजगावच्या संस्थाध्यक्ष मा. सौ. कल्याणीताई नेवसे यांचा वाढदिवस संस्थेच्या वतीने अत्यंत साध्या, आनंददायी आणि स्नेहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.यावेळी उपस्थित संचालिका प्रतिक्षा नेवसे, कल्याणीताई नेवसे यांच्या हस्ते केक कापून त्यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
संस्थेचे नोडल अधिकारी अण्णासाहेब रासकर, प्रशासकीय अधिकारी श्री सखाराम राजळे सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामदास बिटे यांनी त्यांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व समाजसेवेतील कार्याला अधिक यश लाभो, अशा मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या.याप्रसंगी संस्थेच्या शैक्षणिक, सामाजिक व ग्रामीण विकासाच्या कार्याचा गौरव करण्यात आला. संस्थाध्यक्ष कल्याणीताई नेवसे यांच्या नेतृत्वाखाली संस्था ग्रामीण भागातील शिक्षण, कृषी, सामाजिक उपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत आहेत असे मत मार्गदर्शक प्राचार्य डॉ. रामदास बिटे यांनी मांडले.
वाढदिवसानिमित्त कोणताही अनावश्यक दिखाऊपणा न करता साधेपणाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सर्व उपस्थितांनी त्यांना शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला. कार्यक्रमात संस्थेचे नोडल अधिकारी अण्णासाहेब रासकर, प्रशासकीय अधिकारी सखाराम राजळे, प्राचार्य डॉ. रामदास बिटे, सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.शेवटी उपस्थितांनी कल्याणीताई नेवसे यांना वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा शुभेच्छा देत, त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेची प्रगती अधिक वेगाने होवो, अशी सदिच्छा व्यक्त केली.







