गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या -पेन वाटप
दहिवडी प्रतिनिधी: जयराम शिंदेमलवडी (ता.माण.)
आषाढ शुद्ध नवमी. गुरुवार दि. 23 जुलै 2026 रोजी संकट मोचन मंदिर, मलवडी येथे परमपूज्य गुरुदेव मंहत श्री शांतिगिरी जी महाराज यांच्या पावन सानिध्यात गुरुपौर्णिमा महोत्सव श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक उत्तरदायित्वाच्या वातावरणात संपन्न झाले.
संकट मोचक मंदिर, मलवडी येथे परमपूज्य महंत शांतिगिरी जी महाराजांच्या सानिधी ध्यात भक्ती, संस्कार आणि सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी संगम आहे “गुरू ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देवो महेश्वर:!गुरु : साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुखे नमः//भारतीय संस्कृतीत गुरु हे केवळ शिक्षण देणारे व्यक्तिमत्व नसून जीवनाला योग्य दिशा देणारे दीपस्तंभ मानले जातात.
गुरु माणसांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करतात, संस्कार रुजवताना आणि समाज हिताची प्रेरणा देतात. गुरुपौर्णिमा हात्या ऋणांची कृतज्ञतेने आठवण करून देणारा पवित्र दिवस आहे. याच पवित्र पर्वा निमित्त मंहत शांतिगिरीजी महाराजाप्रती निस्सीम श्रद्धा असलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवर, समाजसेवक, वारकरी, उद्योजक आणि सेवाभावी व्यक्तींनी एकत्र येत आर्थिक दृष्ट्या दुर्बल, होतकरू आणि गरजू विद्यार्थी-विद्यार्थिनींना मोफत वह्या आणि पेन वाटप करण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. हा उपक्रम केवळ साहित्य वाटपा पुरता मर्यादित नसून “ज्ञानदान हीच श्रेष्ठ दान “या भारतीय संस्कृतीतील विचाराला प्रत्यक्ष कृतीत उतरवणारा आहे.
आजच्या स्पर्धात्मक युगात अनेक गरीब कुटुंबांना मुलाच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करणे कठीण जाते. अशा परिस्थितीत समाजातील सक्षम व्यक्तीने स्वयंपुरतीने पुढे येऊन विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात देणे हीच समाजासाठी प्रेरणादायी बाब आहे. सामाजिक समता, शैक्षणिक प्रगती आणि मानवी मूल्याची जोपासना या उपक्रमातून अधोरेखित होत आहे, या सेवाभावी उपक्रमात पुढील मान्यवराचे मोलाचे योगदान लाभत आहे :०
श्री. अरुण भाऊ भुजबळ (चेअरमन, विविध सेवा सोसायटी, बोडके) ० श्री. संतोष भाऊ आबासो गोरे (युवा नेते, बोराटवाडी) ०हे.भ.प. श्री. संतोष महाराज बोराटे (व्याख्याते, समाज प्रबोधनकार, किर्तनकार संस्थापक अध्यक्ष,-माणदेश वारकरी संघ)० श्री.डी.आर. भुजबळ, (सेवानिवृत्त सहाय्यक वाहतूक निरीक्षक) ० श्री. वामन तात्या जाधव (माजी सरपंच, बोडके- बोराटवाडी)० श्री. संजू मामा गाडे (माजी उपसरपंच, बोडके -बोराटवाडी) ०ह.भ.प. श्री. अशोक महाराज बोराटे ० श्री. पांडू तात्या सपकाळ (माजी चेअरमन)० श्री. हेमंत दादा गोरे (भजन सम्राट) ० श्री. दीपक शेठ पवार (प्रोप्रायटर, बरम्हागीरी टूर्स अँड ट्रॅव्हल्स, दहिवडी)० श्री. भीमराव शेंबडे (अण्णा अण्णा) आंधळी ० श्री. विक्रम पोपट गोरे (स्वीय सचिव)० श्री. निळकंठ वसंत गोरे (उद्योजक) ० श्री. अनिल काळे सर (उद्योजक) ० हे.भ.प. श्री. संदीप महाराज सुतार ० श्री. विक्रांत मच्छिंद्र गोरे (उद्योजक)० श्री. निलेश दौलत गोरे (मायक्रो नेट कॅम्पुटर सेंटर दहिवडी) ० श्री. सुरज तानाजी गोरे (प्रोप्रायटर, माणदेश बिग बाजार, दहिवडी) ० श्री. गणपत दादा कुंभार (हॉटेल एसटी कॅन्टीन मलवडी)०हे.भ.प. श्री. सुभाष तात्या शिंदे (सावता माळी इलेक्ट्रिशन मलवडी) ० जयराम शिंदे (पत्रकार, पाणवन)० श्री.बापुना आत्राम (एसटी चालक दहिवडी आगार व पत्रकार) या उपक्रमामुळे गुरुपौर्णिमा हा उत्सव केवळ धार्मिक विधी पुरता मर्यादित न राहता सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणारा सोहळा ठरत आहे.
शिक्षणासाठी केलेली मदत ही भविष्यातील सक्षम, सुशिक्षित आणि जबाबदार नागरिक घडवण्याची गुंतवणूक आहे. समाजातील प्रत्येक सक्षम व्यक्तीने आपल्या परीने अशा उपक्रमांना हातभार लावल्यास अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळू शकते. गुरुच्या शिकवणुकीतून मानवतेची सेवा, शिक्षणाचा प्रसार आणि समाजहिताची भावना जपली जाते. मलवडी येथील हा गुरुपौर्णिमा महोत्सव त्या परंपरेचे जिवंत उदाहरण ठरत असून, श्रद्धा आणि सामाजिक जबाबदारी याचा सुंदर संगम घडवून आणत आहे.







