आदर्श मराठी /गुजराती विद्यामंदिर नंदुरबार येथे शिक्षकदिन संपन्न
त-हाडी
नंदुरबार येथील स्वा. सै. श्री. गोकुळदास देसाई आदर्श मराठी विद्यामंदिरात शिक्षक दिवस उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका सौ मिनाक्षी भदाणे यांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पुजन व माल्यार्पण करण्यात आले.
या प्रसंगी आदर्श गुजरातीचे मुख्याध्यापक श्री भद्रेशभाई त्रिवेदी उपस्थित होते
विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षकाची भुमिका करत अध्यापन केले. वक्तृत्व स्पर्धा, निबंध लेखन, काव्यगायन सादर केले
शाळेच्या शिक्षिका सौ शितल अजबे यांनी शिक्षकदिनाचे महत्त्व विशद केले. सुत्रसंचालन सौ मिना अहिरे तर आभार सौ माधुरी पवार यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी सहकार्य केले







