दोंडाईचा नाभिक समाज हितवर्धक संस्थेच्या अध्यक्षपदी छोटू महाले उपाध्यक्षपदी महेंद्र चित्ते तर सचिवपदी कैलास चित्ते यांची निवड…
त-हाडी- ( प्रतिनिधी) दोंडाईचा शहर नाभिक हितवर्धक संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव निवड तीन वर्षानंतर करण्यात येत असते. या निवडीत अध्यक्षपदी छोटू महाले यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी महेंद्र चित्ते, राजेंद्र सोलंकी, सचिव पदी कैलास चित्ते कार्य अध्यक्ष अनिल ईशी यांची निवड करण्यात आली.
दि. 4 संत सेना महाजन पुण्यतिथीचे औचित्य साधून शहर नाभिक हितवर्धक संस्थेची वार्षिक मिटिंग घेण्यात आली. यात तीन वर्षानंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव निवड करण्यात येत, यात सर्वानुमते अध्यक्षपदी छोटू महाले यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी महेंद्र चित्ते, राजेंद्र सोलंकी, सचिव कैलास चित्ते कार्यअध्यक्ष अनिल अशी अशी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. जाहीर झालेल्या कार्यकारणीचे मावळत्या कार्यकारिणीचे यथोचित सत्कार करून पदभार दिला. सदर निवडीचे सर्वच स्थावरून अभिनंदन करण्यात येत आहे.









