डोंगरगाव परिसरात कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी = प्रकाश पाटील*
================================
डोग रगाव (प्रतिनिधी) आर आर पाटील यावर्षी जून महिन्यापासून पावसाने सलग दोन महिने पाठ फिरवीली त्याच्यात बऱ्याच प्रमाणात पिके जळाली काही शेतकऱ्यांनी विहिरीच्या पाण्याने जिवंत ठेवली परंतु ऑगस्ट व सप्टेंबर या महिन्यात खूपच मोठे मुसळधार पाऊस झाल्याने कापसाचे उत्पादन पूर्ण हातातून गेलेले आहेत कारण मे महिन्याचा जो मोठा कापूस होता तो पाण्याचा बाष्प ( धूवारी) मुळे पूर्ण फुल गळ झालेली आहे ज्या परिपक्व कापसाची बोन्डे शिल्लक आहेत त्या जास्त पाण्यामुळे झाडावरच कुजून गेलेल्या आहेत आणि कापसाची पाने ही पूर्णपणे लाल झालेले आहेत
आता कितीही कीटक नाशक फवारणी केली तरीदेखील काहीएक उपयोग होणार नाही कारण या परिसरात आज कृषी विभागाचे कृषी पर्यवेक्षक स्मिता पानपाटील व सुजाता वाघ यांनी शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली एकंदरीत 2017 यावर्षी जसा कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला होता त्याच पद्धतीने या वर्षी देखील मोठ्या प्रमाणात कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे म्हणून शेतकऱ्यांनी टाकलेले भांडवल देखील निघणार नाही शेतकरीवर्ग एकूणच अडचणीत सापडलेला आहे म्हणून या संदर्भात शासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना यासंदर्भात नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी धुळे व नंदूरबार जिल्हा डी ड़ी सी बँकेचे संचालक प्रकाश पाटील व शेतकरी यांनी शासनाकडे केलेली आहे







