• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

जयंतराव पाटील यांनी आटपाडी तालुक्याचे मसिहा बनावे……..सादिक खाटीक यांची मागणी .

माणगंगा by माणगंगा
September 9, 2021
in सांगली
0
जयंतराव पाटील यांनी आटपाडी तालुक्याचे मसिहा बनावे……..सादिक खाटीक यांची मागणी .

जयंतराव पाटील यांनी आटपाडी तालुक्याचे मसिहा बनावे

सादिक खाटीक यांची मागणी .

_______________________


आटपाडी दि . ९ ( प्रतिनिधी )


कृष्णाईचे पाणी दुष्काळी तालुक्यात आणून भगिरथाचे काम करणाऱ्या जलसंपदा मंत्री ना . जयंतराव पाटील यांनी आटपाडी तालुक्यात विकासाची गंगा साकारत या भागाचे मसिहा बनावे अशी अपेक्षा राष्ट्रवादीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक यांनी केली आहे .
आटपाडी तालुक्याच्या विकासाच्या अनुषंगाने सादिक खाटीक यांनी विविध दैनिकांशी बोलताना ही भावना व्यक्त केली .


टेंभूच्या पाण्याने या मतदार संघात शेती उद्योग व्यवसायाला मोठी चालना मिळू लागली असून मोठ्या प्रमाणात उत्पादन होवू लागलेल्या उसासाठी या भागातल्या साखर कारखानदारीला उर्जितावस्था दिली जाणे महत्वाचे आहे . बंदिस्त पाईपलाईनचे जाळे सर्वत्र पोहचू लागले असले तरी पोट पाईप लाईनची कामे तातडीने पूर्णत्वास जाणे महत्वाचे आहे . डाळींब, द्राक्षे अशा विविध फळ पिके यासाठीची कारखानदारी, विविध फळांवर संशोधन करणारे केंद्र आटपाडीत आणणे महतवाचे ठरणार आहे . प्रचंड पिकवल्या जाणाऱ्या कपाशीला स्थैर्य देईल असे कापड निर्मितीची युनिट, उच्च दर्जाचा भाजीपाला, धान्य, कडधान्ये यांच्या एक्सोर्ट साठीच्या व्यवस्था, उत्तम दर्जाच्या मटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या बोकडे, बकरे, शेळ्या, मेंढ्या यांच्या वर उद्योगांची उभारणी करणे , बोकड – बकरे यांच्या एक्स्पोर्ट क्वालीटीच्या मटना साठी कारखानदारी निर्माण करणे , तसेच चपळ, देखणे ,जातीवंत आणि प्रचंड कामाच्या खिलार बैल, खोंड , गाई , म्हैशी यांच्या संवर्धना साठी मोठे प्रयत्न करण्या बरोबर हे लाख मोलाचे पशुधन जतन करण्यासाठी पशुपालकांना विशेष योजनांद्वारे आधार देणे महत्वाचे ठरणार आहे . तालुक्यातल्या प्रत्येक गावात गोशाळा उभारून गाई चे दुधापासून बनणारी उत्पादने निर्माण करणे, गाईचे शेण , गोमुत्र यापासून बनणारे देशी प्रॉडक्ट निर्माण करून या व्यवसायाला अच्छे दिन आणल्यास प्रत्येक गाव, खेडे आर्थिक दृष्ट्या संपन्न व आरोग्य दायक बनु शकेल . शिवाय खिलार गोवंशाचे उत्तम संवर्धन होऊ शकेल . भारतभर प्रसिद्ध असलेल्या स्वतंत्रपूरच्या कैद्यांच्या वसाहतीत महिलां कैदया साठीची स्वतंत्र वसाहत आणि बाल गुन्हेगारांवर संस्कार करणारे संस्कार केंद्र उभारणे संयुक्तीक होणार आहे . आटपाडी शहरा लगत २००० एकर जमिन अधिग्रहण करून त्यांचा मोठा मोबदला जमिन मालकांना आधी देत मोठी औद्योगिक वसाहत उभी करण्या बरोबरच शेकडो उद्योग व्यवसाय, आणि वेग वेगळया कारखानदारी साठी पालकमंत्री जयंतराव पाटील हेच मसिहा ठरू शकतात . तालुक्यातल्या तीर्थ क्षेत्र विकासा बरोबर ३ टीएमसी क्षमतेचे १५० वर्षा पूर्वीचे राजेवाडी आणि बुद्धिहाळ तलावांचे पुर्नरुज्जीवन केले जाणे महत्वाचे ठरणार आहे . यातील गाळ काढणे, कॅनॉल, सांडवे, मुख्य धरणाची भिंत पुन्हा मजबूत केल्यास ही भांडी ६ टीएमसी पाणी साठवून ठेवण्यास उपयोगी होतील . देशाला अभिमान वाटावे असे साहित्य , कला , सांस्कृतीक क्षेत्राचा विकास , दिग्गजांच्या स्मारकांचा प्रश्न, गृहागर – पंढरपूर ही कराड – विटा – आटपाडी मार्गे ची रेल्वे , बारामती – विजयपूर ( विजापूर ) आटपाडी मार्गे ची रेल्वे, इत्यादी तालुक्यातील अनेक महत्वपूर्ण मागण्यांना जयंतराव पाटील निश्चित न्याय मिळवून देवू शकतात.


तालुक्यातल्या हजार – दीड हजार बचत गटातल्या सुमारे १५ हजार महिलांना वेगवेगळ्या उद्योग धंद्यासाठी मदत करण्या बरोबरच लिज्जत पापड सारख्या मोठ्या युनिटची प्रत्येक पंचायत समिती गणात उभारणी होणे हजारो महिलांसाठी अत्यंत महत्वाचे ठरू शकते . आणि अशा साठीही जयंतरावांसारखे यशस्वी नेतृत्वच उपयोगी ठरू शकते . तालुक्यातल्या द्रारिद्रय रेषेखालच्या शेकडो कुटूंबांना इस्लामपूरच्या जयंत दारीद्रय निमुर्लन अभियानची आटपाडी येथे शाखा कार्यरत करून दारीद्र रेषेच्या बाहेर काढता येवू शकेल . आणि विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून या सामान्यांचे जीवन फुलून जावू शकते .


ना . जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शना खालील इस्लामपूरच्या जयंत दरिद्रय अभियानातून आजअखेर ४८३९५ लोकांना ३९ कोटी ९१ लाख १३ हजार ५३५ रुपयांच्या सेवेचा लाभ मिळवून दिला गेला आहे . लोकनेते राजारामबापू पाटील यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून गेली १५ वर्षे वाळवा तालुक्यात जयंत दारीद्र निर्मलन राबविले जात आहे . या अभियानाने हजारोंना मदतीचा हात दिला आहे . भांडवलापासून प्रशिक्षणापर्यत सर्व काही पुरवले जाते. लोकनेते राजारामबापूंनी दुष्काळी भागाला असेच हात देवून उभे केले . अंधार असणाऱ्या प्रत्येक घरात उजेड पोहचवला . दुबळ्या माणसांना बळ देवून शक्तीवान बनविले . कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली . या पार्श्वभूमीवर आटपाडी तालुक्यात जयंत दारीद्रय निर्मूलन च्या शाखेच्या माध्यमातून दारीद्रय रेषेखालच्या शेकडों ना दारीद्र रेषेच्या वर आणण्यासाठी तसेच आटपाडी तालुक्याच्या चौफेर सर्वांगीण विकासासाठी ना .जयंतराव पाटील यांच्या सारखा मोठ्या दिलाचा माणूसच आटपाडी सह खानापूर, जत, कवठेमहंकाळ सारख्या उपेक्षित भागासाठी मसिहा ठरू शकतो असे सादिक खाटीक यांनी स्पष्ट केले .

Views: 752
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
पिक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यास पोलीस ठाण्यात डांबले…..शिक्याचा गैरवापर करणारे तालुका कृषी अधिकारी वर गुन्हा दाखल करण्याची मागणी..

पिक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यास पोलीस ठाण्यात डांबले.....शिक्याचा गैरवापर करणारे तालुका कृषी अधिकारी वर गुन्हा दाखल करण्याची मागणी..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)