साईबाबा पथ शाळेत ऑनलाईन झूम पद्धतीने आंतराष्ट्रीय योगदिन उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आला….!
मुंबई-परेल
मनपाच्या साईबाबा पथ या शाळेत उत्स्फूर्तपणे आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला सर्व शालेय विद्यार्थ्यांनी उत्साहाने भाग घेऊन योगाची योग्यरित्या प्रात्यक्षिके सादर केली. संचालिका श्रीमती मीनल श्रीनिवासन, शिवानी मॅडम , सविता मॅडम, सावंत मॅडम , म्हसकर सर, शिक्षक गण यांनी योगा प्रात्यक्षिक केले. योगा पटू आर्य तेटाबे यांने
योगाची विविध प्रात्यक्षिके करून दाखविली. क्रीडा शिक्षक योगेश साळवी सर यांनी ऑनलाइन द्वारे झूम मीटिंग घेऊन विविध योगा प्रत्यक्षिकसहित योगा दिन साजरा करण्यात आला. जवळजवळ १५० विद्यार्थ्यांनी व २० शिक्षक यांनी उत्साहाने सहभागी होऊन आंतरराष्ट्रीय योगदिन उत्स्फूर्तपणे साजरा केला. वरिष्ठ पर्यवेक्षक श्री राजेश घाडगे सर तसेच कनिष्ठ पर्यवेक्षक श्री लवटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली साईबाबा पंथ या शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला.
प्रतिनिधी
महेश्वर तेटांबे







