गुळेवाडी ता.आटपाडी येथे तिघा चोरट्यांना ग्रामस्थांनी पकडले
गुळेवाडी ता. आटपाडी येथे सायंकाळी 6 च्या दरम्यान चार चोरट्यांनी गावाच्या हद्दीत प्रवेश केला. एका मेंढपाळाची शेळी चोरून घेऊन जात असताना ग्रामस्थांनी आरडाओरड करून दोन मोटरसायकलसह तिघांना पकडले त्यापैकी एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला.
यापूर्वी विद्वधुत पंप मोटारीच्या केबल चोरीला जात होत्या. आज प्रत्यक्षात एका मेंढपाळाची शेळी चोरून घेऊन जात असताना ग्रामस्थांनी शिताफीने चोरट्याना पकडले व पोलीस स्टेशनला फोन केला.
त्यानंतर अर्धा ते पाऊण तासांमध्ये पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व तिघा चोरट्यांना ताब्यात घेतले. किशोर पांडुरंग चव्हाण, शरद नंदू बुधावले,संभाजी नारायण बुधावले सर्वजण कलेढोन जिल्हा सातारा येथील रहिवासी आहेत.
खरसुंडी बीट प्रमुख शांताराम वगरे व त्यांच्या टीमने तिघा चोरट्यांना ताब्यात घेतले असून पुढील तपासासाठी त्यांना आटपाडी पोलीस स्टेशन ला पोलीस घेऊन गेले आहेत
तसेच त्यांच्याकडे असणाऱ्या दोन मोटरसायकली एम एच 11 बी एम 74 29 पल्सर व एम एच 11 झेड 62 83 डिस्कवर या दुचाकी गाड्या चोरीमध्ये वापरल्या होत्या, त्या दुचाकी गाड्या ग्रामस्थांनी ताब्यात घेतल्या आहेत.







