विरोधकाकडून 25 लाखाच्या विकासकामाला अडथळा— वंदना गायकवाड
आटपाडी तालुक्यातील शेटफळे गावच्या विकासासाठी सभामंडप 10 लाख रुपये ,पिण्याच्या पाण्यासाठी 3 लाख 60 हजार रुपये, हायमास्ट पोलसाठी 10 लाख रुपये च्या कामासाठी ग्रामपंचायत ना हरकत दाखले देण्यास टाळाटाळ करीत असल्याने विकास कामात आडकाठी आणत असल्याचे निदर्शनास आले आहे
विकास कामासाठी जिल्हा परिषद सदस्य वंदना गायकवाड यांनी धडपड करून गावासाठी निधी आणला आहे
तर दुसरीकडे ग्रामपंचायत विकास कामाला ना हरकत दाखले देण्यास विरोध करीत आहे हे कितपत योग्य आहे हे जनतेने ठरवावे. असे मत जिल्हा परिषद सदस्य वंदना गायकवाड यांनी मांडले आहे हे
यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी लक्ष घालावे अशी मागणी जि. प सदस्य वंदना गायकवाड यांनी केली आहे.








