• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Sunday, April 19, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

मेंढपाळ आर्मीची मेंढपाळ हक्क परिषद मायणीत संपन्न…!!

माणगंगा by माणगंगा
October 14, 2021
in सांगली
0
मेंढपाळ आर्मीची मेंढपाळ हक्क परिषद मायणीत संपन्न…!!

मेंढपाळ आर्मीची मेंढपाळ हक्क परिषद मायणीत संपन्न…!!

राज्य व केंद्र सरकारपुढे अनेक आव्हाने: मेंढपाळ आर्मी मेंढपाळांच्या हक्कांसाठी रणांगणात उतरणार

मायणी प्रतिनिधी


मेंढपाळांच्या न्याय व हक्काला वाचा फोडण्यासाठी मेंढपाळ आर्मी संघटनेची महाराष्ट्रातील पहिली मेंढपाळ हक्क परिषद मायणी या ठिकाणी संपन्न झाली. या हक्क परिषदेला महाराष्ट्र राज्यासह कर्नाटक राज्यातील प्रमुख पदाधिकारी व मेंढपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र राज्यातील मेंढपाळ तसेच मेंढपाळांच्या समस्या यावर प्रमुख पदाधिकारी यांच्यात विचारविनिमय करून मेंढपाळांच्या हिताचे १३ ठराव यामध्ये पारित करण्यात आले. महाराष्ट्रातील शेळी मेंढी महामंडळ उपलाणी आहे. त्याच्याकडे राज्य व केंद्र सरकारने त्वरित बघावे.आम्हाला गोफणगुंडा उचलायला लावु नका असा खोचक सल्ला पदाधिकाऱ्यांनी लगावला.


यावेळी महाराष्ट्रातील मेंढपाळांचे हक्क व त्यांना मिळत असलेले वायदे यावर कवितेचं सादरीकरण करण्यात आले. येत्या काळात मेंढपाळांनी संघटित होण्याची गरज असून संघटित न झाल्यास शासकीय लाभापासून वंचित रहाल असे प्रतिपादन मेंढपाळ आर्मी चे राष्ट्रीय सांसद प्रमुख अर्जुन थोरात यांनी केले. महाराष्ट्रात मेंढपाळांची होणारी वाताहात पाहता गरिबीचं दरिद्रीचं जिनं संपविण्यासाठी मेंंढपाळांनी शपथ घेतली.


महाराष्ट्र शासनाने तालुकानिहाय शेळ्या मेंढ्यांचे प्रदर्शन घ्यावे, मेंढपाळनिर्मित सर्व वस्तुंना राज्य शासनाने हमिभाव बांधुन द्यावा,राहिल त्याच घर “कसेल त्याची जमीन” च्या धर्तीवर महाराष्ट्रातील मेंढपाळांना कुळ कायदा ‌लागु करून शासकीय जमिनी, गायराने,चराऊ कुरणे नावावर करून 7/12 द्यावेत,प्रत्येक तालुक्यात शासनाने स्वतंत्र मेंढशाळा उभाराव्यात, मेंढपाळांना संरक्षणासाठी अॅट्रासिटीपेक्षा कडक कायदा करण्यात यावा,गजिनृत्य,गजिढोल,धनगरी ओव्या,बहुरूढ धनगरी गिते यास शासकीय मानधन मिळावे,पशूवैद्यकीय अधिकारी यांनी मेंढवाड्यावर जाऊन लसिकरण करावे,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी महामंडळास आर्थिक विकास महामंडळ म्हणुन मान्यता देऊन २० योजना कार्यान्वित कराव्यात,महाराष्ट्र शासनातर्फे मेंढपाळ व शेळ्या मेंढ्यांचा शासकीय विमा उतरविण्यात यावा, मेंढीला राष्ट्रीय पशुंचा दर्जा देण्यात यावा, वनकर्मचारी व मेंढपाळ संघर्ष कमी करावा, शासनाने मेंढीला GPS ट्रॅकर बसवून द्यावा,यासह धनगर जमातीचा अनुसूचित जमातींमध्ये सामावेश करण्यात यावा असे १३ ठराव यामध्ये पारित करण्यात आले.

यामध्ये बोलताना मेंढपाळ आर्मी चे महासचिव नवनाथ गारळे म्हणाले मेंढपाळ हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असुन त्याला जीवंत ठेवण्यासाठी सरकारने त्वरित पाऊले उचलायला हवीत,अन्यथा संघर्ष अटळ आहे.
त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष प्रा चंद्रकांत हुलगे यांनी संघटना मजबूत करण्याचे आदेश पदाधिकारी यांना दिले १ लाख मेंढपाळ नोंदणी करण्याचे मेंढपाळ आर्मी चे ध्येय असल्याने सर्व पदाधिकारी यांनी झाडुन कामाला लागावे असे प्रदेशाध्यक्ष श्री हुलगे म्हणाले.


मेंढपाळ आर्मी चे कार्याध्यक्ष श्री अंकुश मुढे म्हणाले मेंढपाळांचा वनवास आजपर्यंत आपण पाहिला, इथून पुढे मेंढपाळ आर्मी मेंढपाळांच्या सुखदुःखात सामिल होऊन न्याय हक्काला वाचा फोडेन.
संघटन में शक्ती हैं म्हणत मेंढपाळ आर्मी चे संघटक प्रा.राहुल हजारे यांनी संघटना मजबूत करण्याचे आवाहन केले व येत्या काळात मागण्या मान्य न झाल्यास व्यवस्थेशी संघर्ष अटळ आहे असे सुतवाच्य त्यांनी केले.


यावेळी मेंढपाळांना न्याय मिळवून देत उत्तम कामगिरी करणाऱ्या मेंढपाळ योध्यांचा मेंढपाळ आर्मी च्यावतीने यथोचित सन्मान करण्यात आला
यावेळी मेंढपाळ आर्मीचे पदाधिकारी कार्यकर्ते मेंढपाळ बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते….

चौकट
१ लाख मेंढपाळांची नोंदणी करण्याचा मेंढपाळ आर्मी चा निर्धार…
मेंढपाळांच्या मुलांना शाश्वत शिक्षणाचा अधिकार मिळवून देणार.

Views: 355
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
घुसखोर सुध्दा प्रकल्पाबाधित आहेत, दुसरी इमारत बांधून शिल्लक्कांना ताबा द्या. डॉ राजन माकणीकर

घुसखोर सुध्दा प्रकल्पाबाधित आहेत, दुसरी इमारत बांधून शिल्लक्कांना ताबा द्या. डॉ राजन माकणीकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आटपाडीतील तलावातील विद्युत पंपाच्या केबलची चोरी 50–60 शेतकऱ्यांना फटका, लाखोंचे नुकसान!केबल चोरीची तिसरी घटना, पोलिसांच्या कारवाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष
  • आज जागतिक वारसा दिन – वर्ल्ड हेरिटेज डे
  • विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..
  • प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)