• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Sunday, November 8, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

जेष्ठ भाई संपतराव पवार व कॉ. गिताबाई शिरतोडे, कॉ. उल्का महाजन यांना पुररस्कार जाहीर

माणगंगा by माणगंगा
October 14, 2021
in सांगली
0
जेष्ठ भाई संपतराव पवार व कॉ. गिताबाई शिरतोडे, कॉ. उल्का महाजन यांना पुररस्कार जाहीर

यंदाचा कॉ.बळव़ंतराव शिरतोडे राज्यस्तरीय श्रमप्रतिष्ठा पुरस्कार पर्यावरण चळवळीतील ज्येष्ठ नेते भाई संपतराव पवार यांना तर कॉ.गिताबाई शिरतोडे कर्तृत्ववान महिला सन्मान पुरस्कार सेझ आंदोलनातील लढाऊ नेत्या कॉ.उल्का महाजन यांना जाहीर

खानापूर विटा ;

पलूस,कडेगाव ,खानापूर तालुका परिवर्तनवादी चळवळ व समाजवादी प्रबोधिनी परिसर शाखांच्या वतीने दिला जाणारा यंदाचा ‘कॉ.बळवंतराव शिरतोडे राज्यस्तरीय श्रमप्रतिष्ठा पुरस्कार ज्येष्ठ पर्यावरणवादी,पाणी चळवळ व दुष्काळ निर्मूलन चळवळीचे नेते, क्रांती स्मृती वनाचे निर्माते जलनायक भाई संपतराव पवार यांना तर ‘कॉ. गिताबाई शिरतोडे कर्तृत्ववान महिला सन्मान पुरस्कार’ आदिवासी महिलांच्या साठी काम करणाऱ्या व सेझ आंदोलनाच्या लढाऊ नेत्या कॉ. उल्का महाजन (रायगड) यांना जाहीर झाल्याची माहिती पुरस्कार निवड समितीचे प्रमुख प्रा. डॉ. बाबुराव गुरव,भाई व्ही .वाय.पाटील, कॉ. मारुती शिरतोडे यांनी आज दिली.


ते म्हणाले की बळवंतराव शिरतोडे यांनी आयुष्यभर पुरोगामी परिवर्तनवादी विचार जपला.क्रांतिसिंह नाना पाटील, नागनाथ अण्णा नायकवडी, जी. डी.(बापू )लाड यांच्या परिवर्तनवादी चळवळीत काम करून चळवळीला बळ दिले. मुलांना नातवंडांना पुरोगामी विचारांचे धडे दिले. स्वतः ते अखेरपर्यंत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य म्हणून राहिले. त्यांचा श्रमिक कष्टकरी आणि कामगाराप्रती असलेला आदर तसेच डाव्या पुरोगामी चळवळीतील योगदानाच्या स्मृतीस उजाळा देण्यासाठी त्यांच्या पहिल्या स्मृती दिनापासून हा पुरस्कार देण्यात येतो.हे पुरस्काराचे दहावे वर्ष आहे.कष्टकरी कामगार व उपेक्षिता साठी आयुष्य वेचणाऱ्या ,त्यांच्याशी निष्ठा ठेऊन सामाजिक बांधिलकी जपत विविध क्षेत्रात महान काम करणाऱ्यांना हा पुरस्कार दरवर्षी प्रदान केला जातो. आतापर्यंत आयटक कामगार संघटनेचे लढावू नेते प्रा.कॉ. तानाजी ठोंबरे , ज्येष्ठ साम्यवादी विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे, थोर स्वातंत्र्यसेनानी श्रमिक मुक्ती दलाच्या नेत्या क्रांतीविरांगना इंदुताई पाटणकर, सत्यशोधक शेतकरी क्रांती दलाचे राज्य संघटक कॉम्रेड किशोर ढमाले,बिडी कामगार संघटनेचे नेते, सोलापूरचे माजी आमदार कॉ.नरसय्या आडम,दै.दिव्य मराठीचे संपादक व साम टि.व्ही.चे माजी संपादक,लेखक संजय आवटे, सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे, श्रमिक मुक्ती दलाचे संस्थापक अध्यक्ष कॉ. डॉ. भारत पाटणकर आदींना देण्यात आलेला आहे.त्याचबरोबर कॉम्रेड गिताबाई शिरतोडे कर्तुत्वान महिला सन्मान पुरस्कार महाराष्ट्रातील महिलांच्या प्रश्नावर त्याचबरोबर डाव्या पुरोगामी चळवळीत शेतकरी कामगार कष्टकरी यांच्यासाठी सक्रीय असलेल्या लढाऊ महिलांना प्रदान केला जातो.

यापूर्वी भारतीय महिला फेडरेशनच्या राज्याध्यक्ष कॉ.स्मिता पानसरे,आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या भारतीय समाजशास्त्रज्ञ ज्येष्ठ लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या डॉ.कॉ.गेलं आॉमवेट यांना प्रदान करण्यात आला आहे.यंदाच्या पुरस्कारांचे संयुक्तरीत्या१४ नोव्हेंबर ला वितरण करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीच्या ज्येष्ठ नेत्या शैला दाभोळकर यांच्या हस्ते तर.पुणे विधान परिषद पदवीधर मतदार संघाचे आमदार अरुण (अण्णा) लाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होईल. मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ ,पुस्तक व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे.उद्या कॉ.बळवंतराव शिरतोडे यांच्या दहाव्या स्मृतीदिनाच्या पूर्व संध्येला हे दोन्ही पुरस्कार जाहीर करीत आहोत.

Views: 246
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
विजयादशमी निमित्त कापूस खरेदीचा शुभारंभ महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न !!

विजयादशमी निमित्त कापूस खरेदीचा शुभारंभ महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)