प्रस्थापितांना धक्का देत बहुसंख्य कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश.!
पुसद-
येणाऱ्या नगर परिषद,पंचायत समिती व जिल्हा परिषद निवणुकीच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडी च्या आढावा बैठकीचे आयोजन शासकीय विश्रामगृह पुसद येथे करण्यात आले होते.
यामध्ये गाव तिथे शाखा,वार्ड तिथे शाखा या संकल्पनेने वंचित ची पुढील वाटचाल करण्यात येईल.तसेच बहुसंख्य कार्यकर्त्यांनी जाहीरपणे वंचित बहुजन आघाडी चे पुसद तालुका अध्यक्ष बुद्धरत्न भालेराव व शहर अध्यक्ष शे.मुक्तार शे.निजाम यांच्या नेतृत्वामध्ये जाहीर प्रवेश केला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नानाभाऊ बेले हे होते,
प्रमुख पाहुणे म्हणून यशवंत कांबळे तर प्रमुख उपस्थिती म्हणून उत्तम मस्के हे होते.
वंचित मध्ये प्रवेश केलेले कार्यकर्ते पुढीलप्रमाणे- अरुण करे,गणेश पठाडे (मा.सरपंच),ओमकार सोनटक्के,गजानन इंगळे,विशाल कांबळे,आकाश ढोले,सिद्धार्थ वाहूळे,शे.अब्दुला रझाक,शे.गुलाम शे,अब्दुल लतिक,राहुल ढोले,बबलू चवरे,गुड्डू जाधव,आदेश मनवर,विनोद जोगदंडे,बापूराव वाहुले,दीपक ढोले अशा अनेक कार्यकर्त्यांनी वंचितमध्ये जाहीर प्रवेश घेतला.
कार्यक्रमाला प्रकाश खिलारे,प्रसाद खंदारे,उद्धव कराडे,विशाल डाके,सद्धम्म जाधव,विपुल भवरे,दीपक पदमे,सचिन सुर्यवंशी,राहुल कांबळे,राहुल धुळधुळे,शेख विक्रम, माधव मनवर,रवी चावरे,शशांक खंदारे,विनोद आठवले,प्रणव भागवत,अजय बनसोडे,नागेश कांबळे,इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता रणवीर यांनी तर आभारप्रदर्शन रवी चावरे यांनी केले.!







