परिवर्तन विचार मंच नागपूर यांचे निवेदन डॉ शंकरराव खरात यांचे स्मारकआटपाडी मध्ये होणे संदर्भात
मुख्यमंत्री . महाराष्ट्र राज्य व नागपूर जिल्हाधिकारी, यांना सादर
नागपूर ;
जिल्हाधिकारी साहेब , नागपूर . विषय : मराठी साहित्य रत्न डॉ. शंकरराव खरात जन्मशताब्दी वर्षा निमित्त आटपाडी जिल्हा सांगली येथे जन्मभूमीत स्मारक करण्या संदर्भात .निवेदन. निवेदक : परिवर्तन विचार मंच. नागपूर . महोदय. आपणास विनंती करण्यात येते की माय मराठी लां अनेक मराठी साहित्य रत्न मिळाले आहेत. जागतिक साहित्यावर मराठी साहित्याकारानी आपला ठसा निर्माण केला. त्या साहित्यकार पैकी कथाकार डॉ शंकरराव खरात होत. त्यांचे साहित्य मराठी सह जगातील अनेक भाषेत प्रसिध्द झाले आहे. ते डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु होते.
जळगाव येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष स्थान त्यांनी भूषविले आहे. त्यांचे तराळ अंतराळ हे आत्मकथन ने उपेक्षितांचे अंतरंग उलगडून दाखवले. केंद्र आणि राज्य सरकारी समिती मध्ये त्यांचे विशेष योगदान राहिले आहे. अश्या मराठी साहित्य रत्नाची जन्मशताब्दी सुरू आहे.त्यांच्या स्मारक करिता डॉ .शंकर राव खरात प्रतिष्ठान आटपाडी जिल्हा सांगली ने मागणी केली आहे. या मागणीला परिवर्तन विचार मंच नागपूर महाराष्ट्र पाठिंबा देत आहे. या मागणी करिता साहित्यकार कलावंत आपल्या स्वाक्षरी ने आपणास निवेदन देत आहोत. आम्हाला पूर्ण खात्री आहे .महाराष्ट्र शासन डॉ शंकर राव खरात स्मारक तयार करून त्यांना अभिवादन करेल. परिवर्तन विचार मंच नागपूर महाराष्ट्र. दिनांक २७/१०/२०२१







