डोंगरगाव येथे ग्राम पंचायत तर्फे कीटकनाशकाची फवारणी*
================================
डोंगरगाव( आर आर पाटील)
आज दिनांक 24 ऑक्टोबर 2021 रोजी ग्रामपंचायत डोंगरगाव मार्फत संपूर्ण गावात साथ रोग निर्मूलनासाठी कीटकनाशकाची फवारणी करण्यात आली चिकन गुनिया ,डेंगू मलेरिया, कोरोना इत्यादींसारखे आजार गावात उदभवू नये म्हणून अगोदरच दखल घेत संपूर्ण गावातून मुतारी, सौचालय, गटारी, गल्लीमध्ये रस्त्यांवर आदिवासी वस्तीत ,जिल्हा परिषद शाळा, ग्रामपंचायत परिसर, सार्वजनिक ठिकाणे .मंदिर परिसर इत्यादी ठिकाणी कीटकनाशकाची फवारणी करण्यात आली वालखेडा ग्रामीण रुग्णालयाचे अधिकारी डॉक्टर्स गावात नेहमी संपर्कात असून डेंगू मलेरिया व चिकनगुनिया साथीचे जागरण करीत असून आजारी रुग्णांना उपचार देखील देत आहेत परंतु ग्रामस्थांनी स्वतः परिसर स्वच्छता ठेवावी असे आवाहनही ग्रामपंचायत मार्फत करण्यात आले या दिवशी जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश पाटील ग्रामपंचायत ऑपरेटर गणेश पाटील, भोला पुरी गोसावी ,हिरालाल रमण भिल ग्रा प शिपाई, रामसिंग भुता भिल , पत्रकार आर आर पाटील इत्यादी उपस्थित होते







