• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

मी परभणीत पुन्हा येईल…. पण भाजपचाच प्रचार करीन ! माजी मंत्री राम शिंदेंची समाजाच्या बैठकीत टोलेबाजी

माणगंगा by माणगंगा
October 24, 2021
in महाराष्ट्र
0
मी परभणीत पुन्हा येईल…. पण भाजपचाच प्रचार करीन ! माजी मंत्री राम शिंदेंची समाजाच्या बैठकीत टोलेबाजी

मी परभणीत पुन्हा येईल…. पण भाजपचाच प्रचार करीन!

माजी मंत्री राम शिंदेंची समाजाच्या बैठकीत टोलेबाजी

प्रतिनिधी

2019 च्या निवडणुकीत परभणीत प्रचाराला येऊन मी युतीचा प्रचार केला. 2024 च्या निवडणुकीत पुन्हा येईल, पण भाजपचाच प्रचार करील अशी टोलेबाजी माजी मंत्री राम शिंदे यांनी धनगर समाजाच्या बैठकीत गंगाखेड येथे बोलताना शनिवारी केली.

येथील प्रेरणा प्राथमिक विद्यालयाच्या सभागृहात जिल्ह्यातील धनगर समाजाच्या पदाधिकारी ,कार्यकर्ते यांची संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती .या बैठकीच्या अध्यक्षस्थानी विठ्ठल रबबडे होते. या बैठकीत बोलताना 2019 ला परभणी लोकसभेची निवडणूक धनगर समाजाचा उमेदवार लढवलेले सखाराम बोबडे पडेगावकर यांनी आपले अनुभव मांडले.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत धनगर समाजाचा एकमेव उमेदवार म्हणून निवडणूक लढवताना मतदार संघातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी मतदारांनी केलेल्या मदत कधीही विसरणार नाही असे त्यांनी सांगितले. पण याच निवडणुकीत धनगर समाजाचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवताना तत्कालीन मंत्री राम शिंदे यांनी माझ्या विरोधात प्रचार केल्याचा उल्लेख सखाराम बोबडे पडेगावकर यांनी बोलतांना केला.

2024 ची लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे सखाराम बोबडे पडेगावकर यांनी सांगितले.यानंतर बोलायला उठलेल्या माजी मंत्री राम शिंदे यांनी तुफान फटकेबाजी केली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मी प्रचारासाठी आलो होतो. सखाराम बोबडे यांच्या रूपाने धनगर समाजाचा उमेदवार उभा असतानाही मी युती धर्म पाळला. बोबडे तुम्ही लोकसभा निवडणूक लढवा. तुम्हाला माझ्याही शुभेच्छा आहेत.पण 2024 ला सुद्धा लोकसभेच्या प्रचारासाठी मी पुन्हा येईल आणि भाजपचाच प्रचार करेल. अशी टोलेबाजी मंत्री राम शिंदे यांनी केले.

एकूणच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सर्व पक्षाकडून धनगर समाजाचे जास्तीत जास्त उमेदवार उभे करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यावेळी सखाराम बोबडे पडेगावकर, आनंदराव बनसोडे, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ सुभाष कदम, माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंढे, सुरेश भुमरे आदींनी आपले विचार मांडले. यावेळी कृष्णा दळणर ,राजेश बालटकर ,नारायण शेंडगे, नारायणराव धनवटे ,आकाश लोहट ,मुंजाभाऊ लांडे ,जयदेव मिसे, नारायण बोबडे, कैलास हजारे, रामेश्वर जेगडे आदीसह जिल्ह्यातील समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जि प सदस्य शंकर वाघमारे तर आभार प्रदर्शन प्राचार्य विश्वनाथ सोन्नर यांनी केले.

Views: 625
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
दैवत काळेल यांची अखिल भारतीय ओबीसी सेवासंघ महाराष्ट्र राज्य सातारा जिल्हा अध्यक्षपदी निवड..

दैवत काळेल यांची अखिल भारतीय ओबीसी सेवासंघ महाराष्ट्र राज्य सातारा जिल्हा अध्यक्षपदी निवड..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)