दैवत काळेल यांची अखिल भारतीय ओबीसी सेवासंघ महाराष्ट्र राज्य सातारा जिल्हा अध्यक्षपदी निवड..
दहिवडी : सर्वसामन्यांशी नाळ असणारे , त्यांच्या प्रश्नांची जाण असणारे , अफाट जनसंपर्क व लोकसेवेची आवड , उत्कृष्ट संघटन कौशल्य , लढवय्या नेञृत्व , अभ्यासु स्पष्ट वक्ता , विद्यार्थीप्रिय उपक्रमशिल प्रयोगशिल शिक्षक दैवत काळेल सर यांची अखिल भारतीय ओबीसी सेवासंघ महाराष्ट्र राज्य सातारा जिल्हा अध्यक्ष पदी निवड..
देशासह महाराष्ट्रात ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात आहे..पण त्यांच्यात एकजुट नाही..भविष्यात समाज एकजुट करण्याची गरज आहे.समाज एकजुट करुन त्यांना एका झेंड्याखाली आणने काळाची गरज आहे..समाजासाठी झटण्याची ताकत व धमक दैवत काळेल यांच्यात आहे..गेली चार पाच वर्षे ते लोणारी समाजाच्या माध्यमातुन ते सातारा सांगली सोलापुर पुणे मुंबई येथिल समाज बांधवाच्या हितासाठी झटत आहेत..कोराणा काळात त्यांनी दिलेला लढा महत्वपुर्ण आहे..त्यांचे नेञृत्वगुण समाजाबद्दलची आस्था बगुन ,सर्व वरिष्टांनी एकमताने त्यांची या पदी निवड केली आहे..त्यांच्या निवडीने नक्कीच ओबीसी ना ताकत मिळेल..
निवडी नतंर दैवत काळेल म्हणाले की आपण सर्वांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला या पदासाठी मला योग्य समजले ते मी नक्कीच सार्थ ठरवीन..भविष्यात राजकिय सामाजिक शैक्षणिक क्षेञात ओबीसी समाजाला न्याय मिळवुन देईन..त्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी लढेन..वंचित उपेक्षित गोर गरिबांना समाजांच्या मुख्य प्रवाहात आणेन..युवकासाठी तुम्हां सर्वांना अभिमान वाटावा असे लक्षवेधित कार्य करेल..ओबीसी समाजाच्या सर्वांगिन विकासाठी प्रयत्न करेन..
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर,आमदार जयकुमार गोरे भाऊ,आमदार गोपीचंद पडळकर साहेब ,शिवाजीराव शिंदे साहेब,प्रा.हणमंत सुतार सर संस्थापक अध्यक्ष, तात्यासाहेब देडे प्रदेशाध्यक्ष, श्रीकांत राणे प्रदेश उपाध्यक्ष, नरेश बीरे खजिनदार, संजय औताडे कार्याध्यक्ष ,उमाजी ढेंबरे,मामासाहेब शिंदे व आबासाहेब शिंदे या सर्वांनी अभिनंदन केले..







