डोंगरगाव ग्रामपंचायतीत आज सर्विस प्लस ऑनलाईन विवाह दाखले नोद्नीस व दाखले देण्यास प्रारंभ*
================================
डोंगरगाव (आर आर पाटील)
शिंदखेडा तालुक्यातील डोंगरगाव येथे दिनांक 25 ऑक्टोबर 2021 रोजी सर्विस प्लस योजनेअंतर्गत ऑनलाईन विवाह नोंदणी प्रारंभ झाला असून दाखले देण्यास सुरुवात करण्यात आली सर्विस प्लस अंतर्गत जन्म मृत्यू व विवाह याची ऑनलाईन नोंदणी करता येणार असून वरील दाखले यापुढे ऑनलाईन नोंदणी करून ऑनलाईन मिळू शकतील परंतु आज सर्वप्रथम ऑनलाइन विवाह नोंदणीस प्रारंभ करून अशा पद्धतीचा दाखला देण्यास आज सुरुवात झाली या दिवशी जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश पाटील ,सरपंच सुवर्णा पाटील, ऊपसरपंच आरोस्तोल पाटील, माजी सरपंच अशोक पाटील, ग्राम रोजगार सेवक ज्ञानेश्वर कोली, ग्रामपंचायत ऑपरेटर गणेश पाटील ,संजय जगन्नाथ पाटील, संजय भाईदास पाटील, ग्रामसेविका जयश्री पाटील ,हिरालाल रंमण भिल इत्यादी उपस्थित होते







