करगणीत स्टोन क्रशर च्या विरोधात उद्या मनसेचे आंदोलन
आटपाडी तहसील कार्यालय येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आटपाडी तालुका यांच्या वतीने प्रकाश स्टोन क्रशर करगणी व राजपथ स्टोन क्रेशर यांच्या स्टोन क्रेशर वर झालेल्या दंडात्मक कारवाईची वसुली रु-5कोटी 54लाख43600 व्हावी.
यासाठी तहसीलदार व पोलीस स्टेशन यांना निवेदन दिले असून उदय आंदोलन प्रकाश स्टोन क्रेशर करगणी यांच्या गेट वर ठिक 11 वाजता केले जाणार आहे
यावेळी सांगली जिल्हा उपाध्यक्ष सत्यवान पिंजारी, जिल्हा सचिव राजेश जाधव, कृषी विभाग अध्यक्ष प्रकाश गायकवाड, हमाल वाहतूक सेना अध्यक्ष दाजी खिलारी, धनाजी पाटील, समाधान कारंडे, बंडगर सर बनपुरी व ग्रामस्थ तालुक्यातील इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.







