अमळनेर ते डोंगरगाव एसटी बस सुरू करण्यासाठी प्रकाश पाटील यांनी दिले निवेदन लवकरच बस सुरू होणार*
================================
डोंगरगाव ( आर आर पाटील)
पाजरा नदीत भा दे श्वर जवळ या वर्षी नवीन पूल तयार करण्यात आलेला आहे या पुलामुळे जळगाव अमळनेर डोंगरगाव_ सोनगीर दोंडाईचा नंदुरबार नवापूर सुरत _गुजरात असा एक नवीन सोइचा व्यापारी मार्ग तयार झालेला आहे या पुलामुळे प्रवाशांचा वेळ व पैसा यात बचत होणार आहे
हा पूल व्हावा म्हणून बऱ्याच वर्षापासून मागणी लावून धरलेली होती परंतु तो पूर्णत्वास आलेला आहे आता या पुलावरून अमळनेर पासून डोंगरगाव पर्यंत एसटीची सुविधा व्हावी म्हणून जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश पाटील व प्रसिद्ध हाड वैद्य भिकन ताराचंद निकम यांनी आज दिनांक 26 ऑक्टोबर 2021 रोजी अमळनेर एसटी डेपो चे डेपो मॅनेजर अर्चना भदाणे यांना एसटी सुरू करण्यासाठी लेखी निवेदन दिले
डेपो मॅनेजर यांनी डोंगरगाव मार्गे बस लवकर सूरु करू असे आश्वासनही दिले ही बस सुरू झाली तर या सर्व मार्गावरील प्रवासी व विद्यार्थ्यांचे हाल थांबतील व धुळे आणि जळगाव जिल्हा यामधील दळणवळण सोयीस्कर होणार या मार्गावर बस सुरु होणार म्हणून प्रवासी व विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केलेले आहे







