पंढरपुरमध्ये एक मन हेलवणारी, अस्वस्थ करणारी, चिड आणणारी घटना घडलीये.. एका अल्पवयीन धनगराच्या लेकीवर नराधमाने बलात्कार केला.. सतत सात दिवस तिचा छळ करण्यात आलाय.
पण छळ करणारा नराधम प्रस्थापितांच्या सरकारमधील काही नेत्यांच्या संपर्कातील-संबंधातील असल्यामुळे त्याच्यावर कारवाई करायला पोलीस यंत्रणा धजावत नाहीये..
मला पोलीस अधिकाऱ्यांनाही विचाराचंय की तुमच्यावर नेमका कोणत्या प्रस्थापित नेत्याचा दबाव आहे?
मला या प्रस्थापितांच्या सरकारला आरोपीची पाठराखण करणाऱ्या यंत्रणेला एकच सांगायचंय..
आमच्या भगिनीला जर न्याय मिळणार नसेल तर लक्षात ठेवा, गाठ आमच्याशी आहे. उद्या जर यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याला जबाबदार सरकार असेल.. महाराष्ट्रात पेटून उठेल..







