विद्यार्थ्यांना मोफत पाठ्य पुस्तकांचे वाटप..
पुसद
नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी स्थानिक मुस्लिम एज्युकेशनल फोरमच्या वतीने एंबीशन कोचिंग क्लासेस रहेमत नगर येथे बैठक घेण्यात आली, या ठिकाणी उपस्थित विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन करण्यात आले व आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना मोफत वह्या, पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले, या कोचिंग क्लासेस मध्ये गरीब विद्यार्थ्यांना व खडसे मैदानातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जात आहे. सर्व विद्यार्थी व शिक्षक , पर्यावरणाचे कौतुक करण्यात आले.यावेळी मिर्झा आदिल बेग फोरमचे अध्यक्ष, सैफ सर इलाईट कोचिंग क्लासेस, अभियंता सलमान मौज़म, फिरोज खान समाज सेवक, मोहम्मद जुनेद, दानिश सर उपस्थित होते.







