भटाणे ता.शिरपूर येथील नुतन माध्यमिक विद्यालयात फटाकेमुक्त दिवाळीचा संकल्प
त-हाडी ता.३०
महाराष्ट्र शासनाचा माझी वसुंधरा उपक्रमात भटाणे गावाणे सहभाग घेतला आहे.ह्यात स्वच्छता आरोग्य वृक्ष लागवड वृक्ष संवर्धन भूजल वाढीसाठीचे नियोजन ध्वनी वायु प्रदुषण अशा विवीध विषयांवर जणजागृती करण्यात येत आहे .दीपावली निमीत्त मोठ्या प्रमाणात फटाके उडविण्यात येतात फटाक्यांच्या अतिषबाजीमुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी व वायु प्रदूषण होते होणारे प्रदूशन कमी व्हावे म्हणून येथील नुतन माध्यमिक विद्यालयात फटाकेमुक्त दिवाळीचा संकल्प करण्यात आला.पर्यवेक्षक ए बी पाटील यांनी प्रदूषणा बाबात विद्यार्थ्यां कडून शपथ घेतली त्या प्रसंगी राजपाल साळुंके डी.पी.पाटील व मान्यवर उपस्थित होते.
मासिक सभेत स्वच्छतेची शपथ
येथिल ग्रामपंचायतीची मासिक सभा सरपंच विकास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली सदर सभेत राजपाल साळुंके यांनी माझी वसुंधरा उपक्रमा विषयी मार्गदर्शन केले त्यात घणकचरा व्यवस्थापित आरोग्य स्वच्छता विषयी मार्गदर्शन करुन स्वच्छतेची शपथ घेतली या प्रसंगी उपसरपंच मिलींद ईशी सदस्य संजय भील संजय पाटील महेंद्र गिरासे दिपक पाटील लक्ष्मण पाटील दरबार गिरासे ग्रामसेवक महेंद्र सोनवणे व मान्यवर उपस्थित होते.
फोटो-भटाणे ता.शिरपुर येथिल नुतन विद्यालयात ध्वनि प्रदुषणाचा संकल्प करतांना विद्यार्थिवर्ग







