नागपूरमधून साहित्यिकांची मुख्यमंत्री ना,उद्धव ठाकरे यांच्या कडे डॉ,शंकरराव खरात यांचे जन्म शताब्दी वर्षात सांगली जिल्ह्यात आटपाडी मूळ गावी स्मारक व्हावे मागणी !
नागपूर ; नागपूर मधून
स्वाक्षरी मोहीम थोर साहित्यकार डॉ शंकरराव खरात यांचे स्मारक आटपाडी जिल्हा सांगली येथे झालेच पाहिजे या मागणी ला पाठींबा देण्याकरिता स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली आहे. परिवर्तन विचार मंच चा तिसरा वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमात साहित्य क्षेत्रातील विविध मान्यवर व्यक्ती नी स्वाक्षरी करून स्मारक करिता पाठींबा दिला आहे. सिद्धार्थ कॉलेज नागपूर येथे दिनांक ३१/१०/२०२१ रोजी दुपारी दोन वाजता स्वाक्षरी मोहीम सुरू झाली होती. मुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्र शासन यांच्या कडे निवेदन देण्यात येणार आहे.