शिंदखेडा तालुक्यातील अतिवृष्टी बाधित जास्तीत जास्त शेतकऱ्यांना समाविष्ट करून मोठा मोबदला द्यावा == प्रकाश पाटील *
================================
डोंगरगाव (आर आर पाटील)= गत वर्षाचे अतिवृष्टीचे नुकसान भरपाईचे अनुदान तालुक्यात काही गावांमध्ये टप्प्याटप्प्याने मिळत असून ते तुटपुंजे आहे यावर्षी जुलै शेवटचा आठवडा वऑगस्ट सप्टेंबर या महिन्यात जी अतिवृष्टी झाली त्यामुळे शेती पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात आतोनात नुकसान झालेले आहे
तालुक्यात सर्वच ठिकाणी अतिवृष्टीमुळे नुकसान झाले असून वर्षी ,नरडाणा ,खलाने ,बेटावद मंडळ अंतर्गत खूप मोठ्या प्रमाणात पिकाची हानी झालेली आहे शासनाने महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यांना अतिवृष्टी बाधित मधून वगळुन दिलेले आहे तसा अन्याय धुळे जिल्ह्यावर व शिंदखेडा तालुक्यावर होऊ नये व धुळे जिल्ह्यात शिंदखेडा तालुक्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीचा निधी उपलब्ध करून द्यावा वरील दोन्ही बाबी जर का शासनाकडून यशस्वी झाल्या नाहीत तर मी स्वतः शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांसह शासनाविरोधात मोठे व तिव्र जनआंदोलन उभे करणार असा मागणी वजा इशारा धुळे जिल्हा बँकेचे मा संचालक प्रकाश पाटील यांनी दिलेला आहे







