शिरपूर ते शहादा रस्ता बनला मृत्यूचा सापळा
खड्डा टाळला अपघात घडला अशी रस्त्याची स्थिती
त-हाडी (प्रतिनिधी)
अंकलेश्वर ब-हाणपूर या तीन राज्यांना जोडणारा रस्त्याची शिरपूर वाघाडी,अर्थे त-हाडी तोरखेडा पासून शहादा दरम्यान प्रचंड दुरवस्था झाली असून रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. खड्डा टाळावा यासाठी वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. त्यातच समोरचे वाहन डाव्या बाजूवर चालवता समोरूनच उजव्या कडेने अंगावर येते त्यामुळे अंधार पडल्यानंतर रोजच लहानमोठे अपघात होत आहेथा.त्यामुळे सदर रस्ता दुरुस्तीची मागणी होत आहे.
महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश या तीन राज्यांना सुखकर आणि सोयीच्या मधला मार्ग म्हणून नेहमीच राज्य मार्गावरती मालवाहतूक करणारे आणि प्रवासी वाहनांची वर्दळ असते.मार्गावरील गावांवरील येणाऱ्या खाजगी प्रवासी वाहतूक , मोटारसायकलींची फार मोठी रहदारी असल्याने या रस्त्यावर ते खड्डे आहेत त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर अपघात घडत आहेत. सदर रस्त्यावर दहाते बारा फूट लांबीचे व दोन ते तीन फूट खोलीचे खड्डे तयार झाले आहेत.शिरपूर पासून अर्थे आश्रमशाळेपर्यंत व वघाडी ते तोरखेडा फाट तर सतत खड्डेच आहेत. रस्त्याचा खड्डा दुरुस्त करावा की रस्ता नव्याने तयार करावा इतकी दयनीय अवस्था रस्त्याची झालेली आहे.
या रस्त्याच्या संदर्भात दुरुस्तीसाठी गेल्या पंधरवाड्यात विविध संघटनांनी आंदोलन केलेले आहेत. सदर रस्त्यावरील वाहतूक रस्ता सोडून साईट पट्ट्यावरून चालते त्यामुळे विरुद्ध दिशेने येणार वाहन समोरच्या वाहनावर केंव्हा येऊन आढळेल हे सांगता येत नाही. भविष्यात रस्ता दुरुस्त न झाल्यास फार मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे, तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष घालून सदर रस्ता दुरुस्त करावा. सदर रस्त्याचे काम त्वरित करण्यात यावे, अन्यथा आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा अर्थे ,वाघाडी त-हाडी वरूळ व विखरण येथील वाहनचालकांनी व ग्रामस्थांनी दिला आहे.
फोटो
खड्डा टाळण्यासाठी एकाच बाजू ने समोरासमोर येणारे वाहने







