ठाकरे सरकारचा खरा चेहरा उघडा झालाय व मराठी एस.टी कर्मचाऱ्यांविषयी त्यांना कुठलीही आपुलकी नाही. हे त्यांच्या कृत्यातून सिद्ध झालंय.
एखादा व्यक्ती जेंव्हा हतबलतेमुळे आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचलतो त्यावेळेस त्याच्यावर बिकट परिस्थिती असते.
अशा वेळेस त्याला धीर देऊन आत्महत्येच्या विचारातून बाहेर काढायचं असतं.
पण यांनी कालपासनं एसटी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करणे, अवमान याचिका दाखल करण्याची मिडीयाद्वारे धमकी देणे. जागोजागी व गावोगावी पोलिसबळाचा वापर करून मंत्रालयाच्या दिशेने निघालेल्या कर्मचाऱ्यांना रोखलं जातंय.
यावरून सिद्ध होते की शांततेत लोकशाही मार्गाने चालू असलेल्या आंदोलनात अनिल परबांना उद्रेक घडवायचाय.
जेणेकरून व पोलीसांच्या लाठ्या -काठ्यांचा वापर हतबल कर्मचाऱ्यांवर करण्याची मोकळीकच अनिल परबांना मिळेल.
यांच्या निजामशाहीमुळे जर कुठल्या कर्मचाऱ्याने हतबल होऊन आत्महत्येचा मार्ग स्वीकारला तर याची सर्वस्वी जबाबदारी ठाकरे सरकारची राहिल.
मला संपूर्ण महाराष्ट्राला आवाहन करायचे की तुमच्या सुखा-दुखात साथ देणाऱ्या लालपरीचे कर्मचारी आज आत्महत्येच्या दारात आहेत.
आज त्यांना तुमच्या मदतीची, धीराची, आपुलकीची गरज आहे. कारण एसटी कर्मचारी जगतील तरच महाराष्ट्राची लालपरी जगेल.







