बोराडी ता.शिरपूर (वार्ताहर)
शिरपूर वाघाडी रस्त्यावरील राज सागर हॉटेल जवळील प्राणघातक खड्डे बुजण्याचे काम भाजपाचे माजी. तालुकाध्यक्ष राहुल रंधे व त्यांच्या सहकाऱ्यांनी श्रमदानातून पूर्ण केले.
शिरपूर शहादा रस्त्यावर अतिशय जीवघेणे खड्डे असतांना त्याकडे शासनाचे कुठलेही लक्ष नसतांना, वाहन चालकांची व प्रवाशांची गाडी चालवताना संघर्ष करावा लागतो हे लक्षात येताच तालुक्याचे युवा नेते राहुल रंधे व त्यांचे सहकारी मित्र मंडळांनी स्वतः कंबर कसून श्रमदानातू पेव्हर ब्लॉक व खडी टाकून खड्डे बुजण्याचे काम केले आहे.
शिरपूर ते शहादा रस्त्यावरील वाघाडी गावाजवळ मोठमोठे प्राणघातक खड्डे पडल्यामुळे अपघात होत आहेत तरी देखील शासन याबाबत दखल घेत नाही म्हणून भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष राहुल रंधे व त्यांच्या सहकारी मित्रांनी हॉटेल राज सागर जवळ मोठ मोठाले खड्डे झाल्यामुळे अनेक अपघात त्याठिकाणी झाले याची दखल घेत त्यांनी स्वखर्चाने खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले आहे या कामामुळे वाहनचालकांनी त्यांचे कौतुक करून त्यांना काही वेळ थांबून सहकार्य देखील केला आहे. खड्ड्यांमुळे अनेक फोरविलर यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे त्यामुळे वाहनचालक त्रस्त होते याबाबतची दखल त्यांनी घेऊन रस्त्यावरील मोठमोठे खड्डे स्वतः हुन बुजण्याचे काम हाती घेतले आहे.
यावर प्रवासी व वाहन चालकांनी देखील राहुल रंधे व मित्र परिवाराचे मनापासून कौतुक केले.
यावेळी राजसागर हॉटेल चे संचालक योगेश पाटील, हेमराज पाटील, निलेश महाजन, प्रमोद पाटील, गजू पाटील, बबन पाटील, भूषण पाटील, दिनेश धनगर, पंकज चव्हाण, विशाल तिरमले, राजू, वकील गोसावी, भुरा पाटील आदींनी श्रम घेतले.







