मोहम्मद उमर नोमान आय आय टी परिक्षेत घवघवीत यश..
पुसद: मुस्लिम एज्युकेशनल फोरम व ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन च्या वतीने मोहम्मद उमर नोमान यांनी सत्कार व सन्माचिन्ह देण्यात आला मोहम्मद उमर नोमान यांनी आय आय टी पात्र परीक्षा २०२१ मध्ये १३५०००० विद्यार्थी मधुन १२००१ परीक्षा पात्र मध्ये गुण मिळवून धनबाद आय आय टी झारखंड मध्ये प्रवेश मिळवला.प्रा. मिर अकील अली याच्या अध्यक्षते मोहम्मद उमर नोमान यांना सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. आय.आय.टी पात्र परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करून तालुकासह जिल्ह्याचा नाव उज्वल केले.सत्कार वेळी मिर्झा आदिल बेग फोरम अध्यक्ष, मिर अकील अली सर, सैय्यद इम्तियाज शहर तालुका निरीक्षक,अमजद खान शहराध्यक्ष , डॉ.मोहम्मद जुबेर तालुका कार्याध्यक्ष , फिरोज खान युवक तालुकाध्यक्ष , मोहसीन खान युवक शहराध्यक्ष , इंजीनियर मौज़म, अब्दुल रहेमान चव्हाण व अन्य उपस्थित होते..







