एस.टी चे सेवानिवृत्त मेकेनिकल सैय्यद अहेमद हाशमी यांचे दुखद निधन…
पुसद :- महाराष्ट्र राज्य परिवहन मंडल पुसद विभागाचे सेवानिवृत्त मेकेनिकल सैय्यद अहेमद हाशमी यांचे वयाच्या 92 व्या वर्षी 11 नोव्हेबर रोजी वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले आहे.
त्यांच्या मागे एस.टी सेवानिवृत्त चालक सैय्यद अब्बास हाशमी , सैय्यद मन्सूर हाशमी एस.टी सेवानिवृत्त चालक , सैय्यद इलियास हाशमी पोलीस कर्मचारी यांच्या सह मुली , नातवंड बराच मोठा आप्त परिवार आहे.
पुसद च्या आख़ेरत नगर जवळ मुस्लिम कब्रस्तान मध्ये रात्री 9 वाजता त्यांची दफनविधी पार पडली शहरातील प्रतिशिष्ठ नागरिक , राजकीय व सामाजिक क्षेत्रातील नेते मंडळी , पत्रकार मंडळी व समाजबांधवांनी सांत्वनपर भेंट देवून शोक व्यक्त केला…







