डॉ,शंकरराव खरात यांच्या स्मारकासाठी स्वाक्षरी मोहीम चौथा टप्पा पूर्ण
नागपूर ;
काव्यफुलेकार कवी संजय शेंडे आणि प्रा. भीमराव गायकवाड स्तंभलेखक दैनिक बहुजन सौरभ .यांनी आज स्वाक्षरी मोहीम चा चौथा टप्पा पूर्ण केला. सिद्धार्थ कॉलेज नागपूर . लेखक कार्यशाळा मध्ये उपस्थित मान्यवर मंडळी नी परिवर्तन विचार मंच च्या स्वाक्षरी मोहीम ला पाठींबा दिला आहे. थोर साहित्यकार डॉ शंकरराव खरात यांचे स्मारक आटपाडी जिल्हा सांगली येथे झालेच पाहिजे या मागणी ला पाठींबा देण्याकरिता स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली आहे. कार्यक्रमात साहित्य क्षेत्रातील विविध मान्यवर व्यक्ती नी स्वाक्षरी करून स्मारक करिता पाठींबा दिला आहे. येथे दिनांक १९/११/२०२१ रोजी दुपारी २:०० वाजता स्वाक्षरी मोहीम सुरू झाली. सर्वांनी सर्वांनी शंकरराव खरात जन्मशताब्दी स्मारक झालेच असा पाठींबा दिला आहे. मुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्र शासन यांच्या कडे निवेदन देण्यात येणार आहे. सही करून पाठींबा देणाऱ्या सर्वांचे आभार. परिवर्तन विचार मंच. नागपूर.महाराष्ट्र.







